Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : पंढरपूर तालुक्यात पशुधनाचे ९२ टक्के लसीकरण

आतापर्यंत ८२ हजार ६७१ गोवंशीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. एस. एस. भिंगारे यांनी सांगितले.

Team Agrowon

सोलापूर ः ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. पंढरपूर तालुक्यात गोवंशीय जनावरांची संख्या सुमारे ८९ हजार इतकी असून, आतापर्यंत ८२ हजार ६७१ गोवंशीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. एस. एस. भिंगारे यांनी सांगितले.

पंढरपूर तालुक्यात ९२ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले असून, लसीकरण राहिलेल्या पशुधनाचेही वेगाने लसीकरण सुरू आहे. तालुक्यात आतापर्यंत २८ जनावरे ‘लम्पी स्कीन’ आजाराने बाधित झाली असून, त्यापैकी आठ जनावरे उपचारानंतर पूर्णपणे बरी झाली आहेत. १७ जनावरांवर उपचार सुरू असून, ३ जनावरे मयत झाली आहेत. लम्पीने मृत झालेल्या एका जनावराच्या मालकाला ३० हजार रुपये मोबदला देण्यात आला आहे. तर उर्वरित २ जनावरांच्या मालकांना मोबदला देण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. भिगारे यांनी दिली.लम्पी त्वचारोगाची बाधा गोवंशीय पशुधनाला होत असून, पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता काळजी घेऊन सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
- डॉ.  प्रियांका जाधव,

तालुका पशुसंवर्धन अधिकारी, पंढरपूर दहा पथके कार्यरत
‘लम्पी स्कीन’ आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका पशुसंवर्धन विभाग सज्ज असून, जनावरांच्या तत्काळ उपचारासाठी १० जलद प्रतिसाद पशुवैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तालुक्यातील १६ गावांमध्ये लम्पी आजाराची जनावरे आढळून आली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT