Pune ZP Agrowon
ताज्या बातम्या

Latest Pune News : पुणे जिल्ह्यात ९० टक्के घरांवर महिलांचे नाव

Women House Owner : महिला ही गृहस्वामिनी असून ती घराची मालकीण आहे. त्यामुळेच घराच्या मिळकतीच्या आठ अ च्या उताऱ्याबरोबरच घरावर महिलांच्या नावाच्या पाट्या लावण्यात येत आहेत.

Team Agrowon

Khed Shivapur : ‘‘महिला ही गृहस्वामिनी असून ती घराची मालकीण आहे. त्यामुळेच घराच्या मिळकतीच्या आठ अ च्या उताऱ्याबरोबरच घरावर महिलांच्या नावाच्या पाट्या लावण्यात येत आहेत.

पुणे जिल्ह्यात ९० टक्के घरांवर महिलांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत," असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी येथे सांगितले.

ससेवाडी (ता. भोर) येथे गृहस्वामिनी अभियान आणि पाणपोई उपक्रमाचे आयुष प्रसाद यांच्या हस्ते सोमवारी (ता. १) लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

भोर तालुका गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय धनवटे, ससेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम गोगावले, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप, पोलिस पाटील अशोक गोगावले, देविदास गोगावले आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आयुष प्रसाद यांच्या हस्ते गृहस्वामिनी अभियानाचे उद्‍घाटन करण्यात आले. या अभियानांतर्गत ससेवाडी गावातील सर्व ३३३ मिळकतींवर महिलांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत.

तसेच गावात उभारण्यात आलेल्या पाणपोईचे उद्‍घाटनही आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुष प्रसाद यांनी ग्रामस्थांशी पाणी प्रश्न, कचरा प्रश्न, गावातील अंतर्गत रस्ते आदी विषयांवर चर्चा केली.

महिला गृहस्वामिनी या उपक्रमांतर्गत घरांच्या मिळकतीच्या आठ अ नमुन्यावर महिलेचे नाव येणार आहे. त्यामुळे मिळकतीच्या व्यवहारात महिलेची स्वाक्षरी आवश्यक असणार आहे. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात ९० टक्के म्हणजे ८ लाख २७ हजार घरांवर महिलांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT