Maharashtra Drought Condition agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Drought Condition : महाराष्ट्रातील ९ जिल्हे रेड झोनमध्ये, अत्यंत कमी पावसाने टँकर सुरू करण्याची वेळ

Maharashtra Rain : राज्यात पाऊस अत्यंत कमी झाला आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बनली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Rain News : यावर्षी अल् निनोमुळे पाऊस कमी होईल अशी शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान देशातील अनेक राज्यात पाऊस अत्यंत कमी झाला आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बनली आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या मान्सूनने दडी मारली राज्यात जुलै महिना सोडल्यास अनेक जिल्ह्यात पावसाची अत्यंत कमी नोंद झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात मान्सून परतीचा प्रवास सुरू होतो. परंतु यंदा मागच्या चार महिन्यात ९ जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबरअखेर सांगली, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, अकोला, अमरावती या जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आतापासून बसत आहेत.

या जिल्ह्यात सरासरीपेक्षा २१ ते ४४ टक्के इतका कमी पाऊस झाला आहे. यंदा फक्त पालघर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नांदेड या चारच जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत पाऊसमान सामान्य राहिले आहे. पावसाळ्याचा चार महिन्यांचा प्रवास संपवत मान्सून राज्यातून ४ किंवा ५ रोजी परतीला निघत आहे. यंदा राज्यातील आठ जिल्हे सप्टेंबरअखेर अवर्षणाच्या छायेत आहेत.

मागच्या चार महिन्यात काहीच जिल्हे ५० टक्क्यांवर गेली आहे परंतु अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊसच झाली नाही.दरवर्षी किमान ८ ते १० जिल्हे अतिवृष्टी, तर १५ ते १८ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत असतो.

तर अत्यंत कमी जिल्हे दुष्काळाच्या छायेत असतात. कोकणात सरासरीपेक्षा ११ टक्के अधिक तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १२ टक्के कमी, मराठवाडा ११ टक्के, तर विदर्भ उणे २ टक्के इतका कमी पाऊस झाला आहे.

जून महिन्यापासून सांगली जिल्ह्यात ४४, सातारा ३७, सोलापूर ३०, बीड २१, धाराशिव २१, हिंगोली २४, जालना ३३, अकोला २३, अमरावती २७ दुष्काळाच्या छायेत आहेत. तर सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी देण्याची सोय सुरू आहे. राज्यात फक्त ४ राज्यात अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे यामध्ये नांदेड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT