Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : ऊस गाळप ८० लाख टनांवर

अंबालिका कारखान्याचे दैनंदिन गाळप सर्वाधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत ९ लाख ३० हजारांपेक्षा अधिक गाळप केले आहे. सहकारी कारखान्यात मारुतराव घुले (भेंडा) पुढे आहे.

Suryakant Netke

नगर ः नगर विभागात यंदा सुमारे १ कोटी ५० ते ६० लाख टन उसाचे गाळप (Sugarcane crushing) होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ८१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. नेहमीप्रमाणे राशीनच्या अंबालिका साखर कारखान्याने (Ambalika Sugar Factory) उच्चांकी गाळपाची परंपरा कायम ठेवली आहे.

अंबालिका कारखान्याचे दैनंदिन गाळप सर्वाधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत ९ लाख ३० हजारांपेक्षा अधिक गाळप केले आहे. सहकारी कारखान्यात मारुतराव घुले (भेंडा) पुढे आहे.

नगर जिल्ह्यात १३ सहकारी व ८ खासगी असे २१ साखर कारखाने, तर नाशिक जिल्ह्यात चार सहकारी व एक खासगी असे पाच कारखाने, तर विभागात एकूण २६ साखर कारखाने सुरू आहेत.

गेल्या वर्षी साखर कारखाने व प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या असमन्वयामुळे अतिरिक्त उसाच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले होते. यंदा मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्‍न भेडसावणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा नगर जिल्ह्यात एक लाख ७५ हजार व नाशिक विभागात २९००० असा साधारण दोन लाख हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे.

मात्र यंदा अति पावसाने उसाच्या उत्पादनात घट झाल्याने साधारण १ कोटी ६० लाख टनापर्यंत गाळप होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे ८० लाख टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे.

७५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत सर्वाधिक अंबालिका साखर कारखान्याने ९ लाख ३० हजार टन, त्यापाठोपाठ मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्‍वर साखर कारखाना भेंडा याने ६ लाख ६० हजार, तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ६ लाख १० हजार टन गाळप केले.

आतापर्यंत नगर जिल्ह्यात ७३ लाख ५६ हजार ७१२ टन, तर नाशिक जिल्ह्यात त ७ लाख ३० हजार टनांचे गाळप झाले आहे.

ऊसतोडणीसाठी मुकादम अथवा मजुरांनी पैसे मागितल्यास कारवाई करण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

‘थोरात’चा सर्वाधिक साखर उतारा

नगर जिल्ह्यात सर्वाधिक ११.१५ साखर उतारा संगमनेरच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा आहे. त्यापाठोपाठ श्रीरामपूरच्‍या अशोक सहकारी साखर कारखान्याचा ११.९ साखर उतारा आहे.

‘अगस्ती’चा १०.३१, ‘केदारेश्‍वर’चा १०.३, ‘कुकडी’चा ९.३७, ‘सहकारमहर्षी’चा ९.६७, ‘अंबालिका’चा १०.४, ‘गंगमाई’चा १०.३९, नाशिकमधील ‘के. के. वाघ’चा १०.६७ तर ‘द्वारकाधिश’चा उतारा १०.६६ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT