Wheat sowing 
ताज्या बातम्या

Wheat Sowing : बुलडाणा जिल्‍ह्यात ७८.७९ टक्‍के गव्‍हाची पेरणी

रब्‍बी हंगामातील गव्‍हाचे पीक कुठे वाढीच्या, तर कुठे ओंब्‍या पडण्याच्या स्थितीत आहे. गव्‍हाच्‍या चांगल्‍या वाढीसाठी सध्या कडाक्‍याच्‍या थंडीची गरज आहे.

टीम ॲग्रोवन

खामगाव, जि. बुलडाणा ः रब्‍बी हंगामातील गव्‍हाचे पीक (Wheat) कुठे वाढीच्या, तर कुठे ओंब्‍या पडण्याच्या स्थितीत आहे. गव्‍हाच्‍या चांगल्‍या वाढीसाठी सध्या कडाक्‍याच्‍या थंडीची गरज आहे. मात्र या भागात सध्या ढगाळ वातावरणामुळे (Cloudy weather) थंडी गायब झाली आहे. या वातावरणाचा गव्‍हाच्‍या वाढीवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे.

जिल्ह्यात या रब्‍बी हंगामात हरभऱ्यानंतर गव्‍हाचे क्षेत्र जास्‍त आहे. बुलडाणा जिल्‍ह्यात कृषी विभागाच्‍या अहवालानुसार सरासरी ७८.७९ टक्‍के गव्‍हाची पेरणी झाली आहे. सध्या गहू वाढीच्‍या अवस्‍थेत आहे. काही भागांत ओंब्‍या बाहेर डोकावत आहेत. गव्‍हाची चांगली वाढ होण्यासाठी, टपोरे दाणे भरण्यासाठी जोरदार थंडी आवश्‍यक मानली जाते.

मात्र सध्या थंडीचा जोर गायब झालेला असल्याने फटका बसण्याची चिन्हे आहेत. हवामान अभ्यासकांच्या मते, बंगालच्‍या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन तयार झालेल्‍या मंदोस नावाच्‍या चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. याचा परिणाम म्‍हणून बुलडाणा जिल्‍ह्यात काही भागांत पाऊसदेखील पडून गेला. रब्‍बीच्‍या पिकांसाठी दिवसा कडक ऊन, तर निरभ्र आकाश आणि रात्री

कडाक्‍याची थंडी असे पूरक वातावरण पाहिजे असते. या वातावरणामुळे नैसर्गिक कीड नियंत्रण राहते. सध्या ढगाळ वातावरण राहत असून ते किडींसाठी पोषक ठरत आहे.

हवामान बदल ही घटना आपल्‍याकडील शेतकऱ्यांना काही नवीन नाही. चांगली थंडी पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र मंदोस या चक्रीवादळामुळे वातावरणातील गारठा गायब झाला असून, ढगाळ वातावरणामुळे तापमानातील उष्णता वाढली आहे. येत्‍या २२ डिसेंबरपासून पुन्‍हा थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात होईल असा हवामान खात्‍याचा अंदाज आहे.

- एस. डी. जगधने, तालुका कृषी अधिकारी, खामगाव

रोहणा परिसरात नोव्‍हेंबर अखेर सर्वत्र रब्‍बीची पेरणी आटोपली होती. यामध्ये गव्‍हाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. गव्‍हाच्‍या वाढीसाठी थंडीचे वातावरण पोषक असते. पेरणी झाल्‍यापासून काही दिवस थंडी पडली. मात्र त्‍यानंतर ढगाळ वातावरणाने चिंता वाढवली आहे.

- नितीन काळे, शेतकरी, रोहणा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT