Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांचे ७१७ कोटी मिळाले

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सात लाख ४१ हजार शेतकऱ्यांचे पाच लाख २७ हजार हेक्टरमधील खरीप, बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) सात लाख ४१ हजार शेतकऱ्यांचे पाच लाख २७ हजार हेक्टरमधील खरीप, बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झाले होते. यात बाधीतांना लागणारा ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा निधी (Fund For Compensation) बुधवारी (ता. २१) जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी लगेच सर्वच सोळा तालुक्यांना वितरित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

जिल्ह्यात यंदा जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली होती. जुलै मध्ये तर एका महिन्यात विक्रमी ६०६ मिलिमीटर पाऊस होऊन पिकांची दाणादाण उडाली होती. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमीन खरडून गेली.

सखल भागातील पिके पाण्याखाली गेल्याने जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मुग या पाच लाख २७ हजार १४१ हेक्टरवरील पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ६६ हेक्टरवरील फळपिके असे एकूण पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.

यात सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांना फटका बसला. या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. यानुसार ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा निधी बुधवारी (ता. २१) जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. यानंतर हा निधी लगेच सर्वच सोळा तालुक्यांना वितरित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

नुकसानीच्या प्रमाणात मिळणार भरपाई

राज्य शासनाने यंदा भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ करुण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत भरपाई देण्याचे निश्‍चित केले आहे. यामुळे जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार सहाशे, बागायती पिकांसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये मिळणार आहेत.

ही भरपाई नुकसानीच्या प्रमाणात मिळणार आहे. स्थानिक यंत्रणेने पिकांचे ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे दाखविले आहे. यानुसार ही भरपाई मिळेल, अशी माहिती सूत्राने दिली.

तालुकानिहाय वितरित केलेला निधी

नांदेड २५,८९,५२,२०० अर्धापूर २९,१६,५२,०००

कंधार ५५,१२,६०,००० लोहा ६१,०५,०४,०००

देगलूर ४२,९५,०४,८०० मुखेड ५४,७०,१९,२००

बिलोली ४०,३५,३९,२०० नायगाव ४१,०५,४७,०००

धर्माबाद २९,५३,९८,८०० उमरी ४०,११,३२,०००

भोकर ५२,४३,०७,२०० मुदखेड २४,२७,०५,६००

हदगाव ८५,२०,२८,००० हिमायतनगर ४२,७४,०७,२००

किनवट ६७,०९,१५,२०० माहूर २२,२०,१९,२००

एकूण ७१७,८८,९१,६००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim: पीक विमा क्लेम ११० टक्क्यांवर; नांदेडसाठी ३११ कोटींचा भार

Solapur Development Works Issues: तीनशे कोटींच्या विकासकामांना ‘ब्रेक’

Water Scarcity: गढूळ पाण्यावर ग्रामस्थांचा जीव

Onion Price Crash: कांद्याच्या गोणी बाजारातच सोडून हताश शेतकरी घरी परतले

Fertilizer Black Marketing: खताच्या काळाबाजाराला घालणार लगाम

SCROLL FOR NEXT