Agriculture Scheme Akola News 
ताज्या बातम्या

Agriculture Scheme : कृषी योजनांसाठी ६.६९कोटींचे नियोजन

अल्पभूधारक शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा परिषद कृषी समितीने सुमारे सहा कोटी ६९लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे.

Team Agrowon

Agriculture Scheme Akola News : जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा (Agriculture Scheme) लाभ मिळण्यासाठी जिल्हा परिषद कृषी समितीने (ZP Agriculture Committee) सुमारे सहा कोटी ६९लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. कृषी सभापती योगिता रोकडे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत यावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषद कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने वैयक्तिक लाभाच्या विविध योजना ९० टक्के अनुदानावर (Subsidy) राबविण्यात येतात. आगामी २०२३ २४ या वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग अशा योजना राबविणार आहे. त्यासाठी कृषी समितीने ६.६९ कोटींचे अंदाजपत्रक बनवले.

शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर पीव्हीसी पाइप पुरविण्यासाठी ८० लाख, एचडीपीई पाइप ८० लाख, इलेक्ट्रिक पंप ८० लाख, सोयाबीन स्वच्छ करण्यासाठी स्पायलर ग्रेडर ८० लाख, प्लॅस्टिक ताडपत्री ८० लाख, बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्पेअर ८० लाख, शेतकरी मेळाव्यासाठी १० लाख, शेतकऱ्यांना बियाणे मिनी किट पुरविणे ५ लाख अशा सुमारे २८ योजनांसाठी ६ कोटी ६९ लाख २३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प पुढील महिन्यात सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये कृषी विभागाला भरघोस निधी मिळण्याची अपेक्षा आहे.

यावेळी संजय अढाऊ, रायसिंग राठोड, प्रकाश अटकळ, नीता गवई, प्रमोदिनी कोल्हे, वेणू डाबेराव, सुनंदा मानवतकर आदी उपस्थित होते. सभेचे कामकाज कृषी विकास अधिकारी डॉ.मुरली इंगळे यांनी सांभाळले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT