Water Storage Agrowon
ताज्या बातम्या

Water Storage : लघू प्रकल्पांमध्ये ५८ टक्के पाणीसाठा

दोन प्रकल्पात सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी (२०२१-२२) या कालावधीत दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

Team Agrowon

परभणी ः Water Storage : परभणी जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सिंचन, पाणीपुरवठ्यासाठी (Water supply) उपसा सुरु असल्याने प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट सुरु आहे.

जिल्ह्यातील २२ पैकी लघु ४ प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्के पाणीसाठा आहे. त्यात वडाळी तलाव ८० टक्के, पाडाळी तलाव ८१ टक्के,राणीसावरगाव तलाव ८८ टक्के, तांदुळवाडी तलाव ७६ टक्के या चार तलावाचा समावेश आहे.

९ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्के त्यात भोसी तलावात ५३ टक्के, बेलखेडा तलाव ५४ टक्के, चारठाणा तलाव ६१ टक्के, देवगाव तलाव ६३ टक्के, कवडा तलाव ५१ टक्के, मांडवी तलाव ५४ टक्के,झरी तलाव ६६ टक्के, टाकळगाव तलाव ५६ टक्के, पिंपळदरी तलाव ७० टक्के यांचा समावेश आहे.

९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात पेडगाव तलाव ३७ टक्के, आंबेगाव तलाव २७ टक्के, नखातवाडी तलाव ४८ टक्के, कोद्री तलाव ४८ टक्के,जोगवाडा तलाव ४० टक्के, चिंचोली तलाव ४८ टक्के, आडगाव तलाव ४७ टक्के, केहाळ तलावात ४७ टक्के,दहेगाव तलावात ४७ टक्के या तलावांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

SCROLL FOR NEXT