jal Jeevan Mission Agrowon
ताज्या बातम्या

Jal Jeevan Mission : रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ गावे ‘हर घर जल’च्या घोषित टप्प्यावर

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १ हजार ३५२ पैकी १ हजार २९२ कामांना वर्कऑर्डर दिली असून ५६ गावे हर घर जल म्हणून घोषित करण्याच्या टप्प्यावर आहेत.

Team Agrowon

Water Supply Scheme रत्नागिरी ः जलजीवन मिशनअंतर्गत (Jal Jeevan Mission) जिल्ह्यात १ हजार ३५२ पैकी १ हजार २९२ कामांना वर्कऑर्डर दिली असून ५६ गावे हर घर जल (Har Ghar Jal Campaign) म्हणून घोषित करण्याच्या टप्प्यावर आहेत. जिल्ह्याचा आराखडा ९१२ कोटीचा असून २०२२-२३ मध्ये प्राप्त ६२.७२ कोटीपैकी ५२.१२ कोटी खर्च झाले आहेत.

जल जीवन मिशनअंतर्गत मार्च २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नियमित आणि दीर्घकालीन पुरेशा दाबाने शुद्ध पाणी दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

जिल्हा वार्षिक कृती आराखडा २०२२-२३ जिल्हास्तरावर तयार करण्यात आला आहे. यामध्ये गावांची संख्या १४७५ असून नवीन योजनांची संख्या ५५४ आणि दुरुस्ती योजनांची संख्या ९२१ आहे.

या आराखड्यामधील नूतन सर्वेक्षणानुसार मागणी नसलेली आणि जीवन प्राधीकरण विभागाकडे वर्ग केल्यामुळे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून १ हजार ३५२ योजनांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी ९१२ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

आतापर्यंत १ हजार ३५२ योजनांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातील १ हजार ३५२ योजनांना तांत्रिक मंजुरी दिली गेली आहे.

आतापर्यंत १ हजार ३२४ योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निविदा जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील ५६ गावे ’हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात घराघरांत नळ जोडणीचे उद्दिष्ट ४ लाख ४४ हजार ९६६ पैकी २ लाख ८६ हजार ९०१ जोडण्या देण्यात आल्या आहेत. योजना राबवताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार सातत्याने आढावा घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT