Onion Agrowon
ताज्या बातम्या

Onion Subsidy : कांदा अनुदानासाठी मिळणार ५४ कोटी ५७ लाख रुपये

Onion Market Prices : फेब्रुवारी व मार्चमध्ये कांदा विक्री केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी ५४ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Team Agrowon

Onion News : कांद्याचे दर पडल्याने राज्य सरकारने फेब्रुवारी व मार्चमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये प्रमाणे दोनशे क्विंटलच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले. या अनुदानासाठी आवश्‍यक असलेली पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांच्या माध्यमातून विक्री झालेल्या कांदा अनुदानापोटी ५४ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आठवडाभरात हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

राज्यातील बाजार समित्यांनी कांदा अनुदानासाठी केलेल्या निधीच्या मागणीनुसार पणन संचालकांनी राज्य शासनाकडे अनुदानाची मागणी केली होती. पणन संचालकांनी केलेल्या मागणीच्या ५३.९४ टक्के या प्रमाणात अनुदान राज्य सरकारने अदा केले आहेत. ज्या जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी अनुदानाची मागणी दहा कोटींच्या आत आहे. त्यांना पूर्ण रक्कम देण्यात आली आहे.

कांदा अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेल्या शेतकऱ्यांमधील एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, याची दक्षता आम्ही घेतली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या आयएफसी कोड, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यांची पडताळणी केली आहे. त्यामुळे शासनाकडून अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्यास काहीही अडचण नाही. शासनाने या निर्णयात दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही केली जात आहे. आठवडाभरात पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग होतील.
किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT