Kadaba Kutti  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Subsidy : सायलेज बॅग, कडबाकुट्टीस ५० टक्के अनुदान

Kadaba Kutti Subsidy : या योजनांचा लाभ थेट हस्तांतरण पद्धतीने (डीबीटी) देण्यात येत आहे. यापूर्वी ११ विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.

Team Agrowon

Satara News : ‘‘जिल्हा परिषदेच्या ‘सेस’अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांबरोबर जिल्हा परिषद कृषी विभागाने दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. पशुधनाच्या कार्यक्षम वापरासाठी मुरघास साठवणुकीसाठी सायलेज बॅग व कडबाकुट्टी योजनेला जिल्हा परिषदेच्या ठराव समितीने मान्यता दिली आहे.

या दोन्ही योजना ५० टक्के अनुदानावर राबविण्यात येतील. योजनेत सहभागासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज करावेत,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषद ‘सेस’अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

नुकतीच ड्रॉ योजनांच्या लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली. या योजनांचा लाभ थेट हस्तांतरण पद्धतीने (डीबीटी) देण्यात येत आहे. यापूर्वी ११ विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.

दुष्काळजन्य परिस्थितीवर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबरोबरच जनावरांच्या चाऱ्यांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी शेतकऱ्यांना मुरघास साठवणुकीसाठी सायलेज बॅग व कडबाकुट्टी यंत्र या दोन योजनांना मंजुरी मिळाली आहे.

जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी सायलेज बॅगची मदत होईल. खर्चात बचत होऊन पशुधनाची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. दुग्ध उत्पादनात सातत्य राहून नफ्यात वाढ होईल.

या योजने अंतर्गत निवड होणाऱ्या लाभार्थ्यांना ५०० किलो ग्रॅम मुरघास साठवणूक क्षमतेच्या अधिकाधिक सहा सायलेज बॅगसाठी किमतीच्या ५० टक्के किंवा १८०० रुपये यापैकी कमी असेल इतके अनुदान दिले जाईल. कडबाकुट्टीसाठी निवड होणाऱ्या लाभार्थ्यांना २ एचपी विद्युत चलित कडबाकुट्टीसाठी (विद्युत मोटारीसह) किमतीच्या ५० टक्के किंवा १३ हजार यापैकी कमी असेल तितके अनुदान मिळेल, असे माईनकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता

Well Subsidy Scheme: सरकारकडून नवी विहीर खोदण्यासाठी ४ लाख तर दुरुस्तीसाठी मिळणार १ लाख रुपये अनुदान; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

Farmer Demand: कर्जमाफीतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढा; अन्यथा दिवाळीत आंदोलन : लक्ष्मीकांत कौठकर

Drought Water Management: ‘मानवलोक’ने घेतला दुष्काळ मुक्तीच्या कामांचा वसा

Moringa in Drought: दुष्काळात शेवगा पीक ठरु शकते फायदेशीर

SCROLL FOR NEXT