Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Theft : पुणे विभागात ४९९ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस

जानेवारी महिन्यात वीज चोरीविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात आली. एकूण ७ हजार ५६७ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली.

Team Agrowon

Electricity Theft News पुणे : जानेवारीमध्ये महावितरणच्या (Mahavitaran) पुणे प्रादेशिक विभागात ४ कोटी ६३ लाख रुपयांची वीज चोरीची (Electricity Theft) ४९९ प्रकरणे व एक कोटी ३४ रुपयांची अनधिकृत वीज वापराची २६४ प्रकरणे उघडकीस आली आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

जानेवारी महिन्यात वीज चोरीविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात आली. एकूण ७ हजार ५६७ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली.

यात ४ कोटी ६३ लाख रुपयांची एकूण ४९९ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली, तर १ कोटी ३४ लाख रुपयांची २६४ अनधिकृत वीज वापराची प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

वीज चोरीच्या २२४ प्रकरणात दोन कोटी सात लाख रुपये वसूल करण्यात आले. तर अनधिकृत वीज वापराच्या ७१ प्रकरणांत २० लाख ५६ हजार रुपये वसूल करण्यात आले.

पुणे परिमंडळात एकूण दोन हजार ७७० वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची २१२ प्रकरणे व वीज चोरीची २२५ प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

बारामती परिमंडळात एकूण एक हजार ५३५ वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची ११ प्रकरणे व वीज चोरीची १८० प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

वीज चोरीविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT