Farmer Suicide Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Suicide : मराठवाड्यात सहा महिन्यांत ४६६ शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. नैसर्गिक आपत्ती सोबतच आर्थिक बाबतीत येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद: मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत जानेवारी ते जून २०२२ दरम्यान ६ महिन्यांत ४६६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) झाल्या. त्यापैकी ३०६ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी पात्र (Farmer Suicide Compensation) ठरली आहेत. ४४ आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरली आहेत. तर ११६ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. नैसर्गिक आपत्ती सोबतच आर्थिक बाबतीत येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. जानेवारी ते जून २०२२ दरम्यान मराठवाड्यात ४६६ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये जानेवारीतील ५९, फेब्रुवारी ७३, मार्च १०१, एप्रिल ४७, मे ७८ तर जून महिन्यात सर्वाधिक १०८ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणाचा समावेश आहे. ४६६ शेतकरी आत्महत्यांपैकी ३०६ शेतकरी आत्महत्यांची प्रकल्प शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरली आहेत. त्यामध्ये जानेवारीतील ५०, फेब्रुवारीतील ६१, मार्चमधील ८६, एप्रिलमधील ३३, मेमधील ४९ तर जूनमधील २७ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांचा समावेश आहे.

दरम्यान, ४४ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. त्यामध्ये जानेवारीतील ७, फेब्रुवारीमधील ८, मार्चमधील ११, एप्रिलमधील ५, मे मधील ३, तर जूनमधील १० शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणाचा समावेश आहे. ११६ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये जानेवारीतील २, फेब्रुवारी व मार्चमधील प्रत्येकी ४, एप्रिलमधील ९, मे मधील २६ तर जूनमधील सर्वाधिक ७१ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांचा समावेश आहे.

सहा महिन्यांत झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी १८६ प्रकरणांत शासनाची मदत देण्यात आली आहे. त्यामध्ये जानेवारीमधील ४९ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणासह फेब्रुवारीतील ५१, मार्चमधील ४५, एप्रिलमधील १८, मे मधील २२ तर जूनमधील एका शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणाचा समावेश असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

सहा महिन्यांतील शेतकरी आत्महत्या

जिल्हा... एकूण... मदतीसाठी पात्र...अपात्र...चौकशी सुरू....मदत मिळाली

औरंगाबाद...७२... ५७...२ ...१३...२३

जालना... ५५... ४५...१०...०... १४

परभणी...३६... १४...१... २१... १४

हिंगोली... १७... १३... ०... ४...१३

नांदेड... ५९... ४६...६...७...११

बीड...१३८... ७७...१९... ४२... ७७

लातूर...३२... २३...३...६...२३

उस्मानाबाद...५७... ३१...३...२३...११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT