Water Conservation Agrowon
ताज्या बातम्या

Water Conservation : लोकसहभागातून ४,५७० बंधारे बांधणार

जिल्ह्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सद्यःस्थितीत ओढे, नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून संरक्षित करण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्ह्यात लोकसहभागातून ४ हजार ५७० वनराई बंधारे बांधण्याचा मानस आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात या वर्षी समाधानकारक पाऊस (Rainfall) झाल्याने सद्यःस्थितीत ओढे, नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून संरक्षित करण्यासाठी कृषी विभागामार्फत (Agriculture Department Nashik) जिल्ह्यात लोकसहभागातून ४ हजार ५७० वनराई बंधारे बांधण्याचा मानस आहे. या उपक्रमात गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे (Vivek Sonawne) यांनी केले आहे.

कृषी विभागामार्फत २०२२-२३ या वर्षात पुरेशा प्रमाणावर पर्जन्यमान झाल्याने संरक्षित सिंचन व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येणार आहे. यामध्ये पाण्याचा प्रवाह पारंपरिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामातील पिकांसाठी पाण्याची गरज भागवता येणार आहे.

यासाठी सिमेंट, खतांची रिकामी पोती, माती व वाळू इत्यादी साधनसामग्रीचा वापर करून वनराई बंधाऱ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बांध तयार करावयाचा आहे. वनराई बंधारा केल्याने स्थानिक नागरिकांना दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

तसेच आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन या साठ्यामधून पाण्याचा उपसा करून उन्हाळी हंगामातील पिके घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.वनराई बंधारे बांधण्यासाठी अंदाजे ७ ते १५ दिवसांचा कालावधी लागत असून, पावासाळ्यानंतरचा सुरू असलेला पाण्याचा प्रवाह विचारात घेऊन सर्वसाधारणपणे प्रवाह बंद होण्यापूर्वी पाणी अडविण्याचे काम करणे आवश्यक आहे.

कृषी कार्यालयातून मिळेल तांत्रिक माहितीवनराई बंधारे बांधण्यासाठी जिल्ह्यातील ४,५७० बंधारे बांधण्यासाठी १५ तालुक्यांमध्ये लक्ष्यांक निश्‍चित करून देण्यात आला असून, त्यामुळे ६ हजार ४८ हजार हेक्टर क्षेत्र जागा संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. त्या अनुषंगाने बंधारा बांधण्यासाठी तांत्रिक बाबी व निकषांची माहिती जाणून घेण्यासाठी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी कळविले आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT