Onion Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Onion Damage : समाजकंटकाने युरिया टाकल्याने चाळीतील ४५ ट्रॉली कांदा खराब

Kanda Chal : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला भाव वाढतील या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवला आहे.

Team Agrowon

Satana News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला भाव वाढतील या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र साठवून ठेवलेल्या कांद्याचे समाजकंटकांकडून नुकसान होत आहे.

चाळीत साठवलेल्या ६० पैकी तब्बल ४० ते ४५ ट्रॉली कांद्यावर समाजकंटकाने युरिया टाकल्याने शेतकऱ्याचे २२ लाख ६८ हजारांहून अधिकचे नुकसान झाले. याप्रकरणी शेतकऱ्याने जायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मोराणे सांडस (ता. सटाणा) येथील शेतकरी निंबा दादाजी शेवाळे हे कुटुंबियांसह परिसरातील इतर शेतकऱ्यांची शेतजमीन तोडबटाईने करतात. त्यांनी उन्हाळ कांदा उत्पादन घेतले होते.

त्यांनी गावाशेजारील भवानी माता मंदिरानजीक गावठाण जागेतील मालकीच्या खळवाडीत कांदाचाळ उभारली. बाजारपेठेत भाव वाढतील या अपेक्षेने चाळीत ६० ट्रॉली कांदा साठवला होता. मात्र बुधवारी (ता. २६) निंबा यांना चाळीत युरिया टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कांदा काळा पडला असून, तो सडू लागला आहे.

समाजकंटकांचा शोध सुरू

निंबा शेवाळे यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करताच पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्यासह, महसूल विभागाचे तलाठी जयप्रकाश सोनवणे यांनी भेट दिली.

वरिष्ठांच्या आदेशान्वये पंचनामा केला असून पोलिस प्रशासनाकडून संबंधित समाजकंटकाचा शोध घेत आहेत. अज्ञात इसमाने कांदा चाळीत युरिया टाकल्याने साठवलेल्या ६० ट्रॉलीपैकी ४५ ट्रॉली कांदा खराब झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे २२ लाख ६८ हजारांचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT