Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : नांदेडमध्ये ४३७ कोटींचे पीक कर्जवाटप

जिल्ह्यात आजपर्यंत ७७.५२ टक्क्यांनुसार ५२ हजार ६१८ शेतकऱ्यांना ४३७ कोटी सात लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nanded Crop Loan : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी राष्ट्रीयीकृत, तसेच ग्रामीण बँकांकडून ५२ हजार ६१८ शेतकऱ्यांना ४३७ कोटी सात लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. यात ग्रामीण बँकेकडून सर्वाधीक १०२ टक्के, तर व्यापारी बँकांकडून ७३ टक्के कर्जवाटप (Loan Allocation) केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात एक हजार ५८१ कोटी ५९ लाख, तर रब्बी हंगामात ५६३ कोटी ८१ लाख, असे एकूण दोन हजार १४५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले होते.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना वेळोवेळी केली होती. दरम्यान, खरीप हंगामात ता. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९४ टक्क्यांनुसार एक लाख ९४ हजार ७९२ शेतकऱ्यांना एक हजार ४९२ कोटी ५० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

यानंतर ऑक्टोबरपासून रब्बीसाठी पीककर्ज वाटप करण्याचे काम सुरू झाले. यात रब्बी हंगामासाठी ५६३ कोटी ८१ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ट होते.

जिल्ह्यात आजपर्यंत ७७.५२ टक्क्यांनुसार ५२ हजार ६१८ शेतकऱ्यांना ४३७ कोटी सात लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

यात ग्रामीण बँकेकडून १०२ टक्के, तर व्यापारी बँकांकडून ७३ टक्के कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

तीन बँका वाटपात शून्य टक्के...

जिल्ह्यातील व्यापारी, खासगी क्षेत्र तसेच ग्रामिण बँकांच्या शाखांना रब्बीत पीककर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले होते. परंतु जिल्ह्यातील करूर वेश्य बँक, कर्नाटका बँक व इंडूसंड या तीन बँका कर्जवाटपात शून्य टक्क्यांवर आहेत.

तर इंडियन ओव्हरसीज बँक व इंडियन बँकेने अतिशय कमी प्रमाणात कर्जवाटप केले आहे. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही कर्जवाटपात हात वर केलेल्या बँकांना ताकीद देण्याची मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT