Water Availability Agrowon
ताज्या बातम्या

अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत ४० टक्के साठा

एकूण सहा मध्यम प्रकल्प असून त्यातील शहानूरमध्ये १८ दलघमी, चंद्रभागामध्ये १९ दलघमी, पूर्णा प्रकल्पांत १७ दलघमी, सपनमध्ये २० दलघमी, पंढरीमध्ये १० दलघमी जलसाठा शिल्लक आहे. सर्व मध्यम प्रकल्प मिळून ८७ दलघमी जलसाठा असून एकूण जलसंचय क्षमतेच्या तो सरासरी ३५ टक्के आहे. ४२ लघू प्रकल्पांत ५२ दलघमी साठा आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील पाणीसाठा लक्षात घेता सिंचन प्रकल्पातही गतवर्षीचा बराच साठा शिल्लक असल्याने या वर्षी सिंचनासाठी व पुरवठ्यासाठी मुबलकसाठा निर्माण होण्याचा अंदाज आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार आहे.

अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या धरणांत सध्या २५९ दलघमी (टीएमसी) जलसाठा शिल्लक असून तो एकूण जलसंचय क्षमतेच्या ४५ टक्के आहे. या धरणातून अमरावती शहरासह ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

एकूण सहा मध्यम प्रकल्प असून त्यातील शहानूरमध्ये १८ दलघमी, चंद्रभागामध्ये १९ दलघमी, पूर्णा प्रकल्पांत १७ दलघमी, सपनमध्ये २० दलघमी, पंढरीमध्ये १० दलघमी जलसाठा शिल्लक आहे. सर्व मध्यम प्रकल्प मिळून ८७ दलघमी जलसाठा असून एकूण जलसंचय क्षमतेच्या तो सरासरी ३५ टक्के आहे. ४२ लघू प्रकल्पांत ५२ दलघमी साठा आहे.

जलसंपदा विभागाने खबरदारीचे उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. आणखी महीनाभर पाणी पुरवण्याचे आव्हान समोर असून प्रत्यक्ष धरणक्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्यानंतरच जलसाठ्यात वाढ होणार आहे.

जिल्ह्यातील जलसाठा

प्रकल्प : उपलब्ध साठा (दलघमी) : टक्केवारी

अप्पर वर्धा : २५९ : ४५

शहानूर : १८ : ४१

चंद्रभागा : १९ : ४८

पूर्णा : १७ : ४८

सपन : २० : ५२

पंढरी : १० : १९

लघू प्रकल्प (४२) : ५२ : २९

एकूण (४९) : ३९८ : ४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

Subsidized Electricity Scheme: कृषिपूरक व्यवसायांना लवकरच सवलतीच्या दराने वीज

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

SCROLL FOR NEXT