crop damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : ओगलेवाडीत ४० एकर ऊस जळून खाक

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत येथील ४३ शेतकऱ्यांचा सुमारे ४० एकर ऊस जळून खाक झाला.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
ओगलेवाडी, जि. सातारा : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत येथील ४३ शेतकऱ्यांचा सुमारे ४० एकर ऊस जळून (Sugarcane Crop Damage) खाक झाला. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास डुबल मळा (Dubal Mala) येथे ही आग लागली. महसूल विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तर प्रशासनाने जळीत ऊस तातडीने गळितास न्यावेत तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, टेंभू रोड रेल्वे स्टेशन फाट्याच्या दक्षिस बाजूस डुबल मळा आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथील हणमंत जगताप यांच्या शेतातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाल्याने प्रथम जगताप यांच्या उसाला आग लागली. वाऱ्याने ही आग परिसरात पसरली. डुबल मळ्यात लागलेली आग वणवे मळा व गोवारेच्या हद्दीपर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड पलिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन दलाच्या वतीने डुबल मळ्‍याच्या उत्तरेकडील आग आटोक्यात आणली. मात्र, उसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असल्याने दक्षिण व पश्चिम बाजूकडील आग विझविण्यात अपयश आले. शेवटी उसाचे क्षेत्र संपल्यानंतर आपोआप आग विझली. तीन तास आगीचे तांडव सुरू होते. वर्ष ते दीड वर्ष सांभाळलेला व वाढवेला ऊस डोळ्‍यासमोर जळताना पाहून शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल झाली. तर अनेक शेतकऱ्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. धुराचे लोट पाहून शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आग विझविण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT