Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : सातारा जिल्ह्यात ३९ लाख टन उसाचे गाळप

जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास वेग आला असून, जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू आहेत. रविवारपर्यंत (ता. २५) या १४ कारखान्यांमधून एकूण ३९ लाख २३ हजार २६२ टन ऊस गाळप झाले आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास (Sugarcane Season) वेग आला असून, जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप (Sugarcane Crushing) सुरळीत सुरू आहेत. रविवारपर्यंत (ता. २५) या १४ कारखान्यांमधून एकूण ३९ लाख २३ हजार २६२ टन ऊस गाळप झाले आहे. त्याद्वारे ३७ लाख ३५ हजार ८६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जरंडेश्‍वर कारखान्याने (Jarandeshwar Sugar Mill) साखर उत्पादन व गाळपात आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळप सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी प्रतिटन २५०० ते ३००० रुपये या दरम्यान दर दिला जात आहे. १४ कारखान्यांनी रविवारपर्यंत ३९ लाख २३ हजार २६२ टन ऊस गाळप केले आहे. त्याद्वारे ३७ लाख ३५ हजार ८६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

कारखान्यांच्या सरासरी उताऱ्यात सुधारणा होऊ लागली असून, जिल्ह्यात सरासरी साखर उतारा ९.५२ टक्के येत आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्यांचा साखर उतारा जास्त आहे. सध्या सहकारी कारखान्यास १०.५५, तर खासगी कारखान्यास ८.८९ टक्के साखर उतारा मिळत आहे.

जरंडेश्‍वर कारखान्याने सर्वाधिक सात लाख २० हजार ५७० टन उसाचे गाळप करून सात लाख १३ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. रयत कारखान्याची साखर उताऱ्यात आघाडी असून, या कारखान्याचा ११.३५ टक्के साखर उतारा आहे.

ऊसगाळप हंगाम सुरू होत असताना जिल्ह्यातील कारखान्यांकडून गाळपाची उद्दिष्टे गाठण्यासाठी मिळेल तेथून ऊस आणला जात असल्याने कार्यक्षेत्रातील सभासदांच्या ऊसगाळपास विलंब केला होत होता. मात्र या वेळी चित्र उलटे झाले आहे. अनेक कारखान्याच्या गाळप क्षमता वाढविल्याने कार्यक्षेत्रातील ऊसतो़डणीस प्राधान्य दिले जात आहे.

कार्यक्षेत्रातील ऊस तो़डल्यामुळे भांडवली खर्चात बचत होत असल्यानेही स्थानिक उसाला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे उसाला तोड वेळेत मिळण्यास मदत होत आहे. काही कारखान्यांकडून सुरुवातीपासून हार्वेस्टरचा वापर सुरू केला आहे. त्यातूनही काही प्रमाणात जिल्ह्यातील शेजारील कारखान्यांत गाळपासाठी जात आहे. ऊस तोडण्यासाठी मजुरांकडून पैसे मागण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र ऊस लवकर आणि नीट तुटावा यासाठी पैसे दिले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT