MPKV Rahuri Convocation Agrowon
ताज्या बातम्या

MPKV Rahuri Convocation: पहिल्यांदाच विद्येचा विद्यादंड महिला अधिकाऱ्याच्या हाती

महात्मा फुले कृषी विद्यापीठात नुकताच पदवीदान समारंभ झाला. या वेळी होणाऱ्या संचलनात विद्येचा विद्यादंड उपकुलसचिवांच्या हाती असतो. छत्तीस वर्षात पहिल्यांदाच हा मान महिला अधिकारी व उपकुलसचिव आशा पाडवी यांना मिळाला.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठात नुकताच पदवीदान (MPKV Convocation) समारंभ झाला. या वेळी होणाऱ्या संचलनात विद्येचा विद्यादंड उपकुलसचिवांच्या हाती असतो.

छत्तीस वर्षात पहिल्यांदाच हा मान महिला अधिकारी व उपकुलसचिव आशा पाडवी (Asha Padvi) यांना मिळाला. पाडवी यांनी दीक्षान्त समारंभाच्या संचलनाचे नेतृत्व केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात नुकताच ३६ वा पदवीदान समारंभ झाला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पदवीदान समारंभ नुकताच पार पडला.

कार्यक्रमाच्या आधी दरवेळी विद्यापीठातील पदव्युत्तर इमारतीपासून कार्यक्रम स्थळापर्यंत प्रमुख पाहुण्यासोबत संचलन केले जाते. साधारण पंधरा ते वीस मिनिटे चालणाऱ्या या संचलनात विद्येचा विद्यादंड मापदंड घेऊन उपकुलसचिव नेतृत्व करतात.

या वेळी विद्यापीठात पहिल्यांदाच उपकुलसचिव पदावर आशा पाडवी यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे पदवीदान समारंभाच्या संचलनात विद्येचा विद्यादंड घेऊन पाडवी यांच्या रूपाने विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच नेतृत्व केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Shetkari 8th Installment : नमोचा आठवा हप्ता पुढच्या आठवड्या जमा होणार; दोन हजार रूपये बँक खात्यावर येणार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर; राज्यातील ८३ टक्के विवाहित, १.८ टक्के अविवाहित, तर ४.७ टक्के विधवा महिलांना मिळतोय लाभ

Bamboo Plantation: बांबू विकास प्रकल्पांतर्गत सहा लाख रोपांची लातूर जिल्ह्यात लागवड

Villagers Protest: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

MAGNET Project: ‘मॅग्नेट’च्या अभ्यासदौऱ्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT