Crop Damage Compensation Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage compensation : अतिवृष्टिग्रस्तांना ३५ कोटी रुपये भरपाई मिळणार

अमळनेर मतदारसंघातील सप्टेंबर २०१९ मधील ४० गावांचे प्रलंबित असलेले अतिवृष्टी चे जवळपास ३५ कोटी रुपये अनुदान वितरणाचा शासन निर्णय सरकारने ३० ऑगस्ट ला प्रसिद्ध केल्याने अखेर मतदारसंघातील ४० खेड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे.

टीम ॲग्रोवन

अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर मतदारसंघातील सप्टेंबर २०१९ मधील ४० गावांचे प्रलंबित असलेले अतिवृष्टी चे जवळपास ३५ कोटी रुपये अनुदान (Crop Damage Compensation) वितरणाचा शासन निर्णय सरकारने ३० ऑगस्ट ला प्रसिद्ध केल्याने अखेर मतदारसंघातील ४० खेड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे.

सप्टेंबर २०१९ च्या अतिवृष्टीचे (Heavy) ३५ कोटी ३१ लाख ७८ हजार रुपये प्रलंबित अनुदानाच्या मदतीचा शासन आदेश जाहीर केल्याबद्दल शासनाचे लोकप्रतिनिधींनी आभार मानले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासोबत तसेच विभागाशी संबंधित सचिवांसोबत लोकप्रतिनिधी व इतरांनी बैठका घेतल्या व हा मुद्दा मांडला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काळातच निधी मंजूर झालेला होता. मात्र सरकार बदलल्याने तांत्रिक अडचणींमुळे शासन निर्णय पारित होण्यासाठी विलंब झाला. पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठविण्यात आला होता. अखेर शासनाला शासन आदेश काढावा लागला, असा दावा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. तर माजी आमदार शिरीष चौधरी यांनीदेखील या संबंधी पाठपुरावा केल्याचा दावा करण्यात आला आहे.

सर्वाधिक अनुदान अमळनेरात

मागील अडीच ते तीन वर्षांत अतिवृष्टी, पीकविमा, शेतकरी कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांतून मिळणारे अनुदान यासाठी जवळपास ५०० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारा अमळनेर मतदार संघ हा एकमेव ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT