Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : परभणी जिल्ह्यातील ३०४४ जनावरे ‘लम्पी स्कीन’ बाधित

प्रादुर्भाव वाढता; ५८ जनावरे गंभीर, १९८ जनावरे दगावली

Team Agrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजारामुळे बाधित जनावरांची संख्या बुधवार (ता. १४) अखेर ३ हजार ४४ पर्यंत वाढली. त्यापैकी १९८ जनावरे दगावली असून त्यात गायी २८, बैल ६६ आणि १०४ वासरांचा समावेश आहे. तर उपचारानंतर १ हजार ८०८ जनावरे बरी झाली आहेत. सध्या या आजाराच्या बाधित जनावरांपैकी ५८ जनावरे गंभीर आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

बुधवार (ता. १४ ) पर्यंत जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील १ हजार २०२ गायी आणि १ हजार ८४२ बैलांना या आजारांचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराची ईपी सेंटर १४२ आहे. इपी सेंटरच्या ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या ६१८ झाली आहे. परभणी जिल्ह्यात एकूण जनावरांची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती. त्यात १ लाख ३७ हजार १५० गायवर्गीय, १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय आणि ९८ हजार ४९५ म्हैस वर्गीय जनावरांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार १५० गाय वर्गीय आणि १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय असे एकूण २ लाख ९९ हजार ८६१ जनावरांच्या लसीकरणासाठी २ लाख ९९ हजार ३०० लसी प्राप्त झाल्या होत्या. जिल्ह्यातील गोशाळांतील ३ हजार ९९५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात गोवर्गात केलेले स्वच्छ लसीकरण ३१ हजार २८९ आहे. बुधवार (ता. १४) पर्यंत १ लाख ३८ हजार ९१६ गायवर्गीय आणि १ लाख ५२ हजार ८६९ बैलवर्गीय आणि ५ हजार ६९ म्हशी असे एकूण २ लाख ९६ हजार ८५४ जनावरांचे (९८. ९९ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

China Rice Imports : भारतीय तुकडा तांदळाची चीनकडून आयात सुरू; जीएमओचे कारण देत नाकारली होती आयात

Mathura Labhan Cattle Research: ‘मथुरा-लभान’ गोवंश संशोधनाचा गौरव

Commercial Farming: तेंडोली गावाने स्वीकारली व्यावसायिक पीक पद्धती

Water Resources Management: तलाव आणि झऱ्यांचे व्यवस्थापन

El Nino Impact: दुष्काळाचा बागुलबुवा

SCROLL FOR NEXT