Election Agrowon
ताज्या बातम्या

Election : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघ निवडणुकीसाठी २८ उमेदवारी अर्ज

सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या १४ जागांसाठी आतापर्यंत २८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

Team Agrowon

सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या १४ जागांसाठी आतापर्यंत २८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. १२ नोव्हेंबरला निवडणूक (Election ) होणार असून, सहकार वैभव पॅनेल आणि श्री. देव पाटेश्वर सहकार परिवर्तन पॅनेलमध्ये ही लढत होत आहे.

जिल्ह्यात सध्या तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे वातावरण आहे. यापूर्वी वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवडणूक १२ नोव्हेंबरला होणार आहे.

ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सहकार वैभव पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत, तर भाजप आणि बाबासाहेबांची शिवसेना हे दोन पक्ष श्री. देव पाटेश्वर सहकार परिवर्तन पॅनेल माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. संघाच्या एकूण १५ जागा असून १ जागा बिनविरोध निवडून आली आहे.

उर्वरित १४ जागांसाठी दोन पॅनेलकडून २८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.येत्या १२ नोव्हेंबरला ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत प्रथमच भाजप आणि शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवीत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT