Irrigation Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation Scheme : कुऱ्हा वढोदा सिंचन योजनेस २२२६ कोटींची सुधारित मान्यता

रावेर लोकसभा क्षेत्रातील तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत कुऱ्हा-वढोदा-इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २२२६ कोटींची तृतीय सुधारित शासन मान्यता देण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

मुक्ताईनगर, जि. जळगाव : रावेर लोकसभा क्षेत्रातील तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत कुऱ्हा-वढोदा-इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस (Irrigation Scheme) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २२२६ कोटींची तृतीय सुधारित शासन मान्यता देण्यात आली आहे.

खासदार रक्षा खडसे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याबाबत मागणी केली होती. खडसेंच्या मागणीनंतर लवकरच योजनेस मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन देऊन अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग यांना तत्काळ कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते.

तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हा-वढोदा-इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचे सिंचन क्षेत्र २५ हजार ८९८ हेक्टर असून, त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील ८ हजार ३३१ हेक्टर व बुलडाणा जिल्ह्यातील १७ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT