Food Poisioning Agrowon
ताज्या बातम्या

Food Poisoning : पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत २२ जणांना भगरीतून विषबाधा

कांबी (ता. शेवगाव) येथील एका कुटुंबातील लोकांनाही भगर खाल्ल्याने त्रास झाला. त्यामुळे नगर जिल्‍ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह तयार झाले आहे.

टीम ॲग्रोवन

नगर : नवरात्रात (Navratri) उपवासासाठी भगर खाण्यात आल्याने शेवगाव,(Shavegaon) पाथर्डी (Pathardi) तालुक्यांत विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २७) घडला. करंजी (ता. पाथर्डी) परिसरातील २२ जणांना भगरीच्या भाकरी खाल्ल्याने त्रास झाला. तर कांबी (ता. शेवगाव) येथील एका कुटुंबातील लोकांनाही भगर खाल्ल्याने त्रास झाला.

त्यामुळे नगर जिल्‍ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह तयार झाले आहे. सध्या नवरात्र सुरू आहे. या काळात अनेक नागरिक उपवास करतात. उपवासाला बहुतांश ठिकाणी भगरीचा वापर केला जातो. पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरातील करंजी, खंडोबाची वाडी, तसेच मराठवाडी येथील अनेक भाविकांनी सोमवारी (ता. २६) रात्री उपवासानिमित्त भगरीच्या भाकरी खाल्ल्या.

त्यानंतर दोन तासांनी संबंधितांना उलटी, चक्कर, मळमळ व श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रात्री दहा वाजता खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. अशोक चव्‍हाण, प्रकाश राठोड, लीलाबाई चव्हाण, गीताबाई चव्हाण, रामदास चव्हाण, अनिता राठोड, सुशीला चव्हाण, रमेश चव्हाण यांना तिसगाव येथील, तर मच्छिंद्र दानवे, आदेश दानवे, भाऊसाहेब दानवे यांना करंजी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विषबाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा

कांबी (ता. शेवगाव) येथील नरके कुटुंबातील शांताबाई धोंडिराम नरके (वय ६०), भाऊसाहेब भीमराव नरके (वय ३८), राजेंद्र शंकर नरके (वय ४५), मनीषा राजेंद्र नरके (वय ३५), अश्विनी शिवाजी नरके (वय ३०) यांना भगर खाल्ल्यानंतर चक्कर येणे, मळमळ होणे, उलट्या, असा त्रास होऊ लागला.

दोन दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्याच्या शेजारील शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यातही अनेकांना भगर खाल्ल्याने त्रास झाला. या प्रकरणी तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाथर्डीचे माजी सभापती अॅड. मिर्झा मण्यार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT