Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : सातारा जिल्ह्यात २२ लाख टन ऊसगाळप

यावर्षीचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या साखर आयुक्तांच्या सूचना होत्या. परतीच्या पाऊस लांबल्याने हंगाम सुरू होण्यास उशिरा झाला. या वर्षी जिल्ह्यात सात खासगी व आठ सहकारी साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत.

टीम ॲग्रोवन

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप (Sugarcane Crushing) सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत सहकारी व खासगी मिळून १५ साखर कारखान्यांनी (Sugar Mills)२२ लाख ४५ हजार ४१७ टन उसाचे गाळप करत त्याद्वारे २० लाख ३४ हजार ४० क्विंटल साखरेची निर्मिती (Sugar Production) केली आहे. यावर्षी सरासरी ९.०६ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

यावर्षीचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या साखर आयुक्तांच्या सूचना होत्या. परतीच्या पाऊस लांबल्याने हंगाम सुरू होण्यास उशिरा झाला. या वर्षी जिल्ह्यात सात खासगी व आठ सहकारी साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत.

यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. ऊस वेळेत गाळपास जावा, यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत असल्याने ऊस तोड मजुरांकडून पैसे मागण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या दीड ते दोन महिन्यांत जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी मिळून २२ लाख ४५ हजार ४१७ टन उसाचे गाळप करत त्याद्वारे २० लाख ३४ हजार ४० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांमध्ये रयत- अथणी कारखान्याची आघाडी घेतली असून, त्यांना १०.९९ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गाळपात सर्वाधिक जरंडेश्वर कारखान्याने तीन लाख ६९ हजार २०० टन उसाचे गाळप करत तीन लाख ७९ हजार टन साखरेची निर्मिती केली आहे. या हंगामात गाळप करणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने ऊस वेळेत जाण्याची आशा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Pest Control: तुरीवरील पाने गुंडाळणाऱ्या अळीची कशी ओळखाल?

E-Praman Portal : ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइन

Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा

Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार

Vegetable Market : फळ-भाजीपाला बाजार सुरू करून उत्पन्नवाढीवर भर

SCROLL FOR NEXT