Government Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Government Subsidy : रत्नागिरीत १८ बचतगटांना २१ लाखांचे अनुदान

कांदळवन कक्षाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात कांदळवन संरक्षणासाठी कोकणातील पाच जिल्ह्यात १४४ बचतगटांना एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत एकूण एक कोटी ७२ लाख ६१ हजार ४८४ अनुदान दिले.

Team Agrowon

रत्नागिरी ः कांदळवन संरक्षणाबरोबरच किनारी भागातील ग्रामस्थांना उपजीविकांचे साधन निर्माण करण्यासाठी कांदळवन कक्षाकडून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील १४४ बचतगटांना (Self Help Group) एक कोटी ७२ लाखांचे अनुदान (Subsidy) दिले. त्यात रत्नागिरीतील १८ बचतगटांना २० लाख ९३ हजार ९२९ रुपये दिले आहेत.

कांदळवन कक्षाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात कांदळवन संरक्षणासाठी कोकणातील पाच जिल्ह्यात १४४ बचतगटांना एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत एकूण एक कोटी ७२ लाख ६१ हजार ४८४ अनुदान दिले. या प्रकल्पांच्या अंदाजपत्रकाला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली आहे.

६८ बचतगट नवीन असून ७६ जुन्या बचतगटांना २०२२-२३ साठी हे अनुदान दिले आहे. सर्वाधिक अनुदान हे जिताडा-काळंदर मासे पिंजरापालन एक कोटी ८९ हजार २२६ रुपये दिले असून, शिंदाणे पालनासाठी ४७ लाख पाच हजार ६१३ रुपये अनुदान दिले. २० सप्टेंबर २०१७ पासून कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना राज्य शासनाच्या कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानमार्फत राबवली आहे.

या योजनेत सामूहिक स्वरूपात (स्वयंसहाय्यता गट) आणि खासगी व्यक्ती यांना कांदळवनातील जिताडा व काळंदर मासे पिंजरापालन, खेकडापालन, कालवे आणि शिंदाणे पालन, शोभिवंत मत्स्यपालन, श्री पद्धत भातशेती, कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन, गॅस वाटप आदी उपजीविकेचे प्रकल्प देण्यात येतात.

२०१७-२२ या वर्षात कोकणातील १४१ गावांत ही योजना राबवण्यात आली आहे. या वर्षी दिलेल्या अनुदानातून एक हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना उपजीविकेचे साधन मिळाले आहे. जून-जुलैपर्यंत हे प्रकल्प राबवून त्यानंतर वाढ झालेल्या माशांची किंवा शिंपल्यांची विक्री करण्यात येईल, असे उपसंचालक डॉ. सुशांत सनये यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT