Electricity  Agrowon
ताज्या बातम्या

Electricity : ‘महावितरण’कडून दोन लाख तक्रारींचे १० दिवसांत निराकारण

Agriculture Electricity : वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने तक्रारींचे प्राधान्याने निवारण करण्याची सूचना देण्यात आल्या होत्या.

Team Agrowon

Solapur News : वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने तक्रारींचे प्राधान्याने निवारण करण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवघ्या दहा दिवसांत प्रलंबित आणि नव्या अशा दोन लाख तक्रारींचे निवारण केले. त्यासोबत बिलांबाबतच्या एक लाख ४२ हजार तक्रारींचे निवारणही करण्यात आले.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर लोकेश चंद्र यांनी ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्राहकांच्या तक्रारींचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी वीज पुरवठा बंदच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्याचा स्पष्ट आदेश दिला.दहा दिवसांत वीज पुरवठा बंदच्या दोन लाख तक्रारींचे निवारण केले.

वीजबंदच्या १ लाख ३८ हजार तक्रारी

गेल्या दहा दिवसात नव्याने दाखल झालेल्या वीज पुरवठा बंदच्या १ लाख ३८ हजार तक्रारींचे निवारण करण्यात आले. त्यासोबत आधीच्या प्रलंबित ६७ हजार तक्रारीही निकाली काढण्यात आल्या.

वीज पुरवठा बंदच्या तक्रारींचे निवारण करताना या तक्रारी लवकर म्हणजे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या काल मर्यादेत दूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT