Jaykwadi Dam Agrowon
ताज्या बातम्या

Jayakwadi Dam : जायकवाडीचे १८ दरवाजे तीन फुटाने उघडले

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग शुक्रवारी(ता २) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अठरा गेट तीन फुटाने वर उचलून वाढविण्यात आला आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून (Jayakwadi Dam) होणारा पाण्याचा विसर्ग (Water Discharge From Jayakwadi) शुक्रवारी(ता २) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अठरा गेट तीन फुटाने वर उचलून वाढविण्यात आला आहे. प्रकल्प तुडुंब होण्याच्या उंबरठावर असताना प्रकल्प प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन केले जाते आहे.

शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ९८.३५ टक्के भरलेल्या जायकवाडी प्रकल्पात १०१.४६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामध्ये ७५.३९ टीएमसी जिवंत पाणीसाठ्याचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रकल्पात २२,४५५ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती.

त्याचवेळी उजव्या कालव्यातून ७०० तर डाव्या कालव्यातून ७०० तसेच १८ गेट दोन फुटाणे उघडून ३९ हजार १२८ क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात होता. शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास १८ गेट दोन फुटाणे उघडून त्यामधून ४७ हजार १६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. या विसर्गात सकाळी साडेअकरा वाजता १८ गेट तीन फुटाणे उघडून वाढ करत ५६,५९२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात होता. अशी माहिती प्रकल्प प्रशासनाचा सूत्रांनी दिली. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचेही प्रकल्प प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT