Landslides and Flood Agrowon
ताज्या बातम्या

Rain Updates: भूस्खलन, पुरामुळे देशात १७ जणांचा मृत्यू

Team Agrowon

(वृत्तसंस्था)

संततधार पावसामुळे देशातील विविध भागांत भूस्खलन (Landslides) आणि पुरामुळे (Flood) बुधवारी (ता. १३) किमान १७ लोकांचा मृत्यू झाला. कर्नाटकात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून ओडिशात गजपती जिल्ह्यात भूसखलन होऊन १० घरांचे नुकसान झाले. पूरसदृश स्थितीमुळे हजारो लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून तेलंगणा राज्यातील शैक्षणिक संस्था शनिवारपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा सरकारने केली.

दिल्लीत पावसाने हजेरी लावली. दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र भागात मंगळवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे १४ जणांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत ३१ हजारांहून अधिक लोकांचे स्थलांतर (Migration) करण्यात आले.

कच्छ, नवसारी आणि डांग जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक रोखण्यात आली आहे, तर ५१ राज्य महामार्ग आणि ४०० हून अधिक पंचायती रस्त्यांचेही नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध जलाशयांच्या पाण्याच्या पातळीतही (Water Storage) वाढ झाली असून त्यातील ३० जलसाठे त्यांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ७० टक्के किंवा त्याहून अधिक भरले आहेत. सौराष्ट्र प्रदेशात राजकोट, गीर सोमनाथ, अमरेली आणि जामनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला.

कर्नाटकात पावसाचे ३२ बळी

कर्नाटकच्या विविध भागांत पावसाने कहर सुरूच ठेवला असून, आतापर्यंत ३२ लोकांचा मृत्यू झाला. मलनाड आणि किनारी कर्नाटकातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरूच असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तसेच भूस्खलन आणि समुद्राची धूप होण्याच्या अनेक घटना घडल्या.

ओडिशात राज्याच्या किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली, गजपती जिल्ह्यात भूस्खलनामुळे किमान १० घरांचे नुकसान झाले तर मलकानगिरी आणि कालाहंडी जिल्ह्यातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले. आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या मलकानगिरी जिल्ह्यातील मोटू भागात मुसळधार पावसामुळे (Extremely Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT