Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Yavatmal News : धान्याऐवजी दीडशे रुपये ही शेतकऱ्‍यांची थट्टा

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता.

Team Agrowon

Yavatmal News शेतकरी आत्महत्याग्रस्त (Farmer Suicide) जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ (Food Security Act) अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता.

मात्र राज्य सरकारने धान्याऐवजी दरमहा दीडशे याप्रमाणे वर्षाला रोख १८०० रुपये शेतकऱ्‍यांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही एक प्रकारे शेतकऱ्‍यांची थट्टाच असल्याचा आरोप होत आहे.

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. एकही हंगाम साथ देत नसल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात पुरता फसला आहे. कर्ज फेडण्याची चिंता सतावत असताना आशादायी होऊन शेतकरी खरीप, रब्बी हंगामात शेतीत राबराब राबतो. कधी कोरडा तर कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊसही पिच्छा सोडताना दिसत नाही. संकटाची मालिका कायम शेतकऱ्‍यांच्या पाठीमागे आहे.

एपीएल धान्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्‍यांना दिलासा मिळाला होता. ती योजनाही राज्य सरकारने गुंडाळली. त्यावर कुणीही आवाज उठविला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कुणी नाहीच, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रतिलाभार्थी एक हजार ८०० रुपये खात्यात जमा करण्यात येतील.

जिल्ह्यात तीन लाख १२ हजार ३२५ लाभार्थ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत काही कारणास्तव गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने कळविले. त्यानंतर शासनानेही हात वर करीत थेट रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ८१ हजार लाभार्थी

यवतमाळ जिल्ह्यात ८१ हजार ५३४ एपीएल कार्डधारक शेतकरी लाभार्थी कुटुंबे आहेत. तर तीन लाख १२ हजार ३२५ इतक्या लोकसंख्येचा यात समावेश आहे. थेट खात्यात रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला ५६ कोटी २१ लाख ८५ हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले जाते.

प्रत्येकच ठिकाणी शेतकऱ्‍यांसोबत भेद करून त्याची थट्टा केली जात आहे. राज्यातील राजकारणाची स्थिती घृणास्पद आहे. एक तर शासनाने योजना आणायलाच नको होती आणि आणली तर ती बंद करायला नको होती. शेतकऱ्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.
मनीष जाधव, शेतकरी नेते, महागाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT