Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Heavy rain : हिंगोलीतील अतिवृष्टीबाधितांसाठी १४ कोटींवर निधीची मागणी

Hingoli News : जुलै महिन्यात हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले, ओढे तसेच कयाधू नदीला पूर आला. सखल भागात पाणी साचून राहिल्याने पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

Team Agrowon

Hingoli News : यंदाच्या (२०२३) जून व जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील २७ हजार ७४२ शेतकऱ्यांच्या १६ हजार ५९९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अपेक्षित १४ कोटी ५४ लाख २८ हजार २०० रुपये एवढ्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जून,जुलै महिन्यात कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या चार तालुक्यांतील अनेक मंडलात अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, नद्यांच्या पुरांचे पाण्यात पिके बुडाली. जमिनी खरडून गेल्या. या चार तालुक्यांतील पेरणी केलेल्या ४२ हजार २३४ हेक्टर पैकी जिरायती क्षेत्रातील १६ हजार ८९ हेक्टर, बागायती क्षेत्रातील ५१० हेक्टर असे मिळून एकूण १६ हजार ५९९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिरायती क्षेत्रातील पिकनुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपयानुसार एकूण १३ कोटी ६७ लाख ५८ हजार २०० रुपये व बागायती क्षेत्रातील पीकनुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी १७ हजार रुपयेनुसार एकूण ८६ लाख ७० हजार रुपये असा एकूण १४ कोटी ५४ लाख २८ हजार २०० रुपये निधी अपेक्षित आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watershed Management: पाण्याबरोबर मातीचाही ताळेबंद महत्त्वाचा...

Agricultural Technology: कृषी तंत्रज्ञान विकासासाठी आंतरविद्याशाखीय गटकार्याची गरज

Paddy Cultivation: एरोबिक भात लागवड - कमी पाण्यात भात उत्पादनाचा पर्याय

Jackfruit Farming: संत्रा पट्ट्यात फणसाचा प्रयोग

Agriculture Crisis: शेतीला गरज सर्वंकष पुनर्रचनेची!

SCROLL FOR NEXT