Sugarcane Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Farmer Fraud : शेतकरी, ऊस वाहतूकदारांची तब्बल १४ कोटींची फसवणूक

Sugarcane Season : जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यात गेल्या दोन दिवसांत दिवसभरात १ हजार ६५८ तक्रारींतून १४० फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यात गेल्या दोन दिवसांत दिवसभरात १ हजार ६५८ तक्रारींतून १४० फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातून शेतकरी व ऊस वाहतूकदारांची तब्बल १४ कोटी ३ लाख ५५ हजार १९२ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली.

ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांसाठी आयोजित विशेष शिबिरातून ही आकडेवारी पुढे आली आहे.

ऊसतोड मजूर व टोळी मुकादम यांच्याकडून शेतकरी व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. याबाबत पोलिस ठाण्यांच्या स्तरावर विशेष शिबिराचे आयोजन केले होते.

यामध्ये दोन दिवाणी तर १० धनादेश न वटलेले गुन्हे आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्वतः हातकणंगले तालुक्यातील पोलिस ठाण्यात भेट देऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांनी आवाहन केल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाल्याच्याही प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT