Nashik ZP News Agrowon
ताज्या बातम्या

Nashik ZP : जिल्हा परिषदेत आता १३८८ ग्रामपंचायती

Nashik News : ग्रामविकास विभागाने ३० जूनला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे ग्रामपंचायतीमधून गोधड्याचा पाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : ग्रामविकास विभागाने ३० जूनला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे ग्रामपंचायतीमधून गोधड्याचा पाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली आहे.

त्यानुसार त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात ८४ ऐवजी ८५ व जिल्हा परिषदेत १३८७ ऐवजी १३८८ ग्रामपंचायती झाल्या आहेत. ही ग्रामपंचायत स्थापनेसाठी सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य व इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरचे आमदार हिरामण खोसकर यांची मागणी व पाठपुरावा सुरू होता.

ग्रामविकास विभागाच्या विविध आदेशांद्वारे तसेच, वाघेरे येथील ग्रामसभेत २६ नोव्हेंबर २०२१ ला वाघेरा ग्रामपंचायतीचे विभाजन करून गोधड्याचा पाडा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत ठराव करण्यात आला होता. तसेच, त्र्यंबकेश्‍वर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी शिफारस केली होती.

त्यानंतर जिल्हा परिषद, स्थायी समितीने १२ सप्टेंबर २०२२ ला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा ठराव केला होता. हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे व त्यांच्यामार्फत शिफारशीने शासनास सादर झाला होता. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्यामुळे स्वतंत्र कार्यकारिणी, ग्रामपंचायत कार्यालय, १५ वा वित्त आयोग व पेसा निधी स्वतंत्रपणे मिळणार आहे.

त्याचप्रमाणे यावर्षी नाशिक तालुक्यातील गंगाम्हाळुंगी या ग्रामपंचायतीमधून सुभाषनगर, बागलाण तालुक्यातील केळझर या ग्रामपंचायतीमधून तताणी व येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी या ग्रामपंचायतीमधून लौकी शिरस अशा तीन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी दिली.

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायतीमधून गोधड्याचा पाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यामुळे गोधड्याचा पाडा या गावाला शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे आता शक्य होणार आहे.
- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT