Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नुकसानग्रस्तांसाठी १३२ कोटी

Team Agrowon

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी(Heavy rainfall) , पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १५७ कोटी ४ लाख ५२ हजार रुपये निधी मिळाला आहे. शुक्रवार (ता. ७) पर्यंत १ लाख ६१ हजार २०७ शेतकऱ्यांना १५४ कोटी ४४ लाख ४२ हजार ६०० रुपये (९८.३४ टक्के) मदतीचे वाटप करण्यात आले आहे. मात्र सततच्या पावसामुळे बाधित, परंतु ‘एनडीआरएफ’च्या (NDRF) निकषांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु त्यासाठी अपेक्षित १३२ कोटी १४ लाख ३६ हजार रुपये निधी वितरणास मान्यता न दिल्यामुळे चार तालुक्यांतील १ लाख ३४ हजार ४०६ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

यंदा अतिवृष्टी, पुरामुळे हिंगोली जिल्ह्यांतील पाच तालुक्यांतील जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण १ लाख १३ हजार ६२० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी प्राप्त निधीमध्ये जिरायती क्षेत्रातील बाधित १ लाख २५ हजार ५७५ शेतकऱ्यांना नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपयेनुसार १५१ कोटी ९७ लाख ७३ हजार रुपये, बागायती क्षेत्रातील बाधित ८ हजार २२७ शेतकऱ्यांच्या प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये नुसार ५ कोटी १ लाख ३९ हजार रुपये, बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीबद्दल १६८ शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपयेनुसार ५ लाख ४० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तालुकानिहाय अतिवृष्टी मदतवाटप स्थिती (कोटी रुपयांत)
तालुका शेतकरी रक्कम टक्केवारी
हिंगोली ६५६८ १०.९१ ९१.६६
कळमनुरी ४६४९८ ४९.०५ १००.००
वसमत ६८०८० ५५.३३ ९७.५७
औंढा नागनाथ १०४५८ ६.९० ९६.७८
सेनगाव २९१०३ ३२.२३ १००.००
सततच्या पावसामुळे बाधित अनुदानाच्या
प्रतीक्षेतील शेतकरी (निधी कोटी रुपयांत)
 तालुका बाधित
क्षेत्र शेतकरी संख्या अपेक्षित निधी
हिंगोली २७०९५ ४९१२६ ३६.८४
कळमनुरी २५३०६ २३८१२ ३५.०८
औंढा नागनाथ २९४५० ४३२०६ ४०.०५
सेनगाव १४८२६ १८२६२ २०.१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT