Land Survey Agrowon
ताज्या बातम्या

Land Survey : भूमी अभिलेख विभागात १२५० भूकरमापक सेवेत रुजू होणार

भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीची मोजणी करणाऱ्या भूकरमापक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीची मोजणी (Land Survey) करणाऱ्या भूकरमापक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यापासून १ हजार २५० भूकरमापक सेवेत रुजू होणार आहेत. या प्रक्रियेमुळे राज्यातील प्रलंबित जमीन मोजणीला वेग येणार आहे.

भूमी अभिलेख विभागांतर्गत जमिनींच्या मोजणीचे काम करण्यात येते. जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. राज्यातील भूमी अभिलेख विभागात विविध प्रकारची एकूण चार हजार पदे आहेत.

त्यापैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे जमीन मोजणीच्या कामांना वेग येत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने भूकरमापकांची पदे भरण्याचे आदेश जारी केले होते.

त्यापैकी १ हजार २५० पदे भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये परीक्षाही घेतल्या होत्या. त्याचा निकालही जाहीर केला होता. आता

कागदपत्रांची छाननी होणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची २१ एप्रिलनंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानुसार पात्र उमेदवारांना येत्या एक मे रोजी भूमी अभिलेख सेवेत दाखल करण्याचे नियुक्ती पत्र दिले जाईल, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT