Honey
Honey Agrowon
ताज्या बातम्या

Honey Export : गेल्या वर्षी देशातून मधाची १२०० कोटींची निर्यात

Team Agrowon

Pune News : देशात श्‍वेत आणि हरितक्रांतीनंतर मधुक्रांतीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या वर्षात (२०२१-२२) देशातून सुमारे १ हजार २०१ कोटींची निर्यात झाली आहे. या माध्यमातून देशातील आदिवासी आणि ग्रामिण भागातील जनतेला रोजगार निर्मिती होत आहे.

यासह जैवविविधता संवर्धन आणि परागीभवनातून शेतीतील उत्पादकतेतही वाढ होण्यास मदत होत आहे. यामुळे आगामी काळात आदिवासी आणि ग्रामीण भागात मधुमक्षिकापालन व्यवसायाला प्रोत्साहन आणि चालना दिली जाईल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय लघु व सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

खादी आणि ग्रामोद्योग विभाग आणि केंद्रीय मधुमक्षिका पालन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शनिवारी (ता.२०) जागतिक मधमाशी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री राणे बोलत होते.

या वेळी राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा, केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष मनोजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी राजनबाबू, मधुमक्षिका तज्ज्ञ शिरीष कराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

राणे म्हणाले,‘‘ पर्यावरणात आणि मानवी जीवनात मधमाशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मधमाशी संवर्धनातून मध संकलनाचा उद्योग वाढत आहे. जगात भारतीय मधाची मागणी वाढत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मधुक्रांती होत आहे.

१८ हजार ग्रामीण उद्योजकांकडून मध व्यवसायाची उलाढाल १ लाख कोटींपर्यंत वाढली आहे. तर सुमारे १ हजार २०१ कोटींची मध निर्यात झाली आहे.’’ विविध राज्यातील मधुमक्षिका पालक, व्यावसायिक, संशोधक, शास्त्रज्ञ यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

‘देशात ८०० पेट्यांचे वितरण’

राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा म्हणाले,‘‘ मधुमाशीपालन हा विविध राज्यातील आदिवासी आणि ग्रामिण जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी चांगला उद्योग ठरत आहे. प्रत्येक राज्याच्या जंगल आणि वनस्पतींच्या वाणांनुसार विविध चवीच्या मध निर्मिती होत आहेत. मध उद्योगात येणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे आजच्या कार्यक्रमात देशपातळीवर सुमारे ८०० पेट्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील २०० पेट्यांचा समावेश आहे. तर देशातील ६ हजार ९१९ लाभार्थ्यांना ३०० कोटींचे, तर महाराष्ट्रातील १९१ लाभार्थ्यांना ९ कोटी ८१ लाखांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

SCROLL FOR NEXT