Irrigation Department Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation Department : बिगर सिंचन संस्थांकडे थकला बारा कोटींचा पाणीकर

जिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या जलशयातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी वापर होतो. शेतीसोबतच बिगर शेती सिंचनकामी देखील हे पाणी वापरले जाते.

Team Agrowon

Wardha News : शेतीसोबतच बिगर सिंचन पाणी (Irrigation Water) वापर संस्थांनाही पाटबंधारे विभागाकडून (Irrigation Department) पाण्याचा पुरवठा केला जातो. सद्यःस्थितीत या संस्थांकडे तब्बल १२.५५ कोटी रुपयांचा पाणीपट्टी कर थकल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

या संस्थांना नोटीस बजावण्यात आल्या असल्या, तरी वसुलीबाबत मात्र पाटबंधारे विभाग फारसा गंभीर नसल्याचा आरोप आहे.

जिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या जलशयातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी वापर होतो. शेतीसोबतच बिगर शेती सिंचनकामी देखील हे पाणी वापरले जाते.

महाकाळी येथील धाम जलाशयातील पाणी धाम नदीपात्रात सोडण्यात आल्यावर वर्धा शहराशेजारील तेरा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, औद्योगिक वापरासाठी वर्धा एमआयडीसी, मध्ये रेल्वे विभाग वर्धा शहरातील पाणीपुरवठ्यासाठी वर्धा नगरपालिका, औद्योगिक वापरासाठी भूगाव येथील उत्तम व्हॅल्यू स्टील कंपनी, ग्रामस्थांना पाणीपुरवठ्यासाठी पवनार व आंजी (मोठी) ग्रामपंचायत, मदन प्रकल्पातून औद्योगिक वापरासाठी मानस ॲग्रो जामणी व बिगर सिंचन पाणी वापर संस्था पाण्याची उचल करतात.

याच संस्थांकडील थकित पाणीकराची रक्‍कम १२.५५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. २०१८ मध्ये दुष्काळी परिस्थितीत वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्पातील पाणी चंद्रपूर जिल्ह्याला देण्यात आले.

त्या वेळी बिल्ट ग्राफिक्‍स पेपर मिल बल्लारशाह व इतरांकडे पाणीपट्टी थकीत होती. त्यातील ५७.६० लाखांची रक्‍कम थकबाकी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर यांच्या आदेशान्वये कमी करण्यात आली, अशी माहिती आहे.

अशी आहे थकबाकी (लाखांत)

जीवन प्राधिकरण - ७.६१

एमआयडीसी वर्धा - ३५.४८

मध्य रेल्वे वर्धा - १०.६२

नगरपालिका वर्धा - १३२.८९

उत्तम व्हॅल्यू स्टील कंपनी- ११७.००

ग्रामपंचायत पवनार - ३.२९

ग्रामपंचायत आंजी मोठी - १.४४

ॲग्रो जामणी - ८७७.०८

बिल्ट ग्राफिक्‍स पेपर मिल बल्लारशाह - ५८.३९

नगर परिषद राजुरा - ०.९५

हॉटेल अरण्यक बोरधरण - ०.१६

विश्रामगृह बोरधरण - ०.२५

मत्स्य बीज केंद्र - १०.१४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Financial Crisis: दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Onion Storage Loss: साठवणुकीत ३७ टक्के कांद्याचे नुकसान

MLA Pension Rule: आमदारांच्या निवृत्ती वेतनाला आव्हान; उच्च न्यायालयाची प्रकरणावर सुनावणीस मान्यता

Urea Subsidy Formula: युरिया अनुदानाचे सूत्र बदलण्याची शिफारस

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’ ठरतेय तापदायक

SCROLL FOR NEXT