Malnutrition
Malnutrition  Agrowon
ताज्या बातम्या

Malnutrition : कुपोषणाच्या विळख्यात अडकली १११७ बालके

टीम ॲग्रोवन

नागपूर : जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) ९३३ व अतितीव्र कुपोषित (Malnourished) १८४ (सॅम) अशी तब्बल १११७ बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकली आहेत. यामध्ये सर्वाधिक कुपोषणाचे (Malnutrition) प्रमाण हिंगणा, नागपूर, सावनेर आणि रामटेक या चार तालुक्यांत आहे.

राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील नवजात आणि लहान मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी शासनाने देशभरात अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये एकात्मिक बाल विकास योजनेतून कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करून कुपोषित मुलांना पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात २१६१ अंगणवाड्या आणि २६२ मिनी अंगणवाड्या अशा २४२३ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यात १ लाख ४० हजारावर बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांचे पोषण केले जाते.

कोरोनामुळे मागील दीड-दोन वर्षांपासून अंगणवाड्या जवळपास बंदच होत्या. पण बालकांना पोषण आहाराच्या रूपात कडधान्य त्यांच्या घरी जाऊन पुरविल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात घेतलेल्या बालकांच्या आढाव्यात कुपोषित मुलांची संख्या वाढली आहे.

या बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी आवश्यक एनर्जी डेन्स न्यूट्रेशन फुड देण्यात येत आहे. या बालकांच्या श्रेणीत लवकरच सुधारणा होईल.
भागवत तांबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जि.प.

मार्च व जुलैची कुपोषण स्थिती (मध्यम तीव्र व अति तीव्र)

तालुका मध्यम तीव्र अति तीव्र

पारशिवनी ६२ ७५

हिंगणा १९९ १९२

नागपूर १६६ १५३

मौदा ४९ ५९

कामठी ८७ ७८

रामटेक १८९ ११९

उमरेड ७७ ६१

सावनेर १४९ १२६

भिवापूर ६० ६१

नरखेड ४३ ४५

कुही ४८ ५२

काटोल ८२ ५७

कळमेश्वर ४८ ४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT