Ujani Dam Agrowon
ताज्या बातम्या

Ujani Dam : जानेवारीतही ‘उजनी’त शंभर टक्के साठा

धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडूनही धरण अद्यापही शंभर टक्याहून अधिक भरलेले आहे.

Team Agrowon

पळसदेव, ता. इंदापूर : पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये (Ujani Dam) जानेवारी महिन्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा (Water Stock) उपलब्ध आहे. यंदा परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडलेला आहे.

धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडूनही धरण अद्यापही शंभर टक्याहून अधिक भरलेले आहे. सन २०२० पासून धरणात जानेवारीत शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध राहत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

भीमा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले उजनी हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात असून, सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यात होतो.

धरणाचा पाणलोट क्षेत्राचा पट्टा मोठा असून, सुमारे ६ किलोमीटरहून अधिक रुंदी व १४० किलोमीटर लांबी असलेल्या या पाण्यावर सुमारे चाळीसहून अधिक सहकारी व खासगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक व्यवसाय अवलंबून आहे.

त्यामुळे दरवर्षी ३० हजार कोटींहून अधिकची उलाढाल होते. धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्यासाठी सीना-माढा, दहिगाव या योजना, बोगदा, मुख्य कालवा व नदीद्वारे दिले जाते.

यंदा परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडलेला आहे. धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडण्यात आले आहे. याच पाण्याचा वापर करुन येथील जलविद्युत केंद्रातून सुमारे तीन कोटीहून अधिक युनिट वीजनिर्मिती केली. त्यामुळे येथील वीजनिर्मितीचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत.

धरणाची पाणी साठवण क्षमता

१०० टक्के भरल्यानंतर ११७ टीएमसी

१११ टक्के भरल्यानंतर १२३ टीएमसी

मृत साठा ६३ टीएमसी

उपयुक्त साठा ५४ टीएमसी

धरणात शंभर टक्के पाणीसाठा असलेली वर्षे

सन २०१०, २०११, २०१८, २०२०, २०२१, २०२२, २०२३

सध्या धरणात १०१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. डिसेंबरमध्ये सोलापूरच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचे नियोजन ठरविले आहे. त्यानुसार २० जानेवारीपासून सोलापूरला कालवा व नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या दहिगाव योजनेतून ६० क्यूसेक व बोगद्याद्वारे ९०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT