Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : पुणे विभागात एक कोटी ६२ लाख टन उसाचे गाळप

पुणे विभागात सहकारी आणि खासगी अशा एकूण ३१ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत एक कोटी ६२ लाख १० हजार टन उसाचे गाळप केले आहे.

Team Agrowon

Sugarcane Crushing Season पुणे ः पुणे विभागात सहकारी आणि खासगी अशा एकूण ३१ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत एक कोटी ६२ लाख १० हजार टन उसाचे गाळप केले आहे.

त्यातून एक कोटी ५७ लाख ४८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ९.७१ टक्के एवढा आहे, अशी माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

पावसामुळे साखर कारखान्याच्या गळीत हंगामात सुरुवातीच्या काळात काहीशा अडचणी आल्या होत्या. त्यानंतर गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले.

पुणे विभागात सातारा, पुणे भागात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी वेळेवर झालेल्यापावसामुळे उसाच्या तीन लाख हेक्टरपर्यंत लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे.

त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे दोन लाख ७४ हजार १९६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे.

शासनाने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निम्याहून अधिक क्षेत्रावरील उसाचे गाळप झाल्याचे चित्र आहे.

अतिपावसामुळे उसाची पुरेशा प्रमाणात वाढ न झाल्यामुळे ऊस तोडणी वेगात सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या कारखान्यामध्ये सहकारी १८ व खासगी १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ७४ हजार ३०० टन एवढी आहे.

विभागात आतापर्यंत ३१ कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये ‘बारामती अॅग्रो’ने गाळपात सर्वाधिक आघाडी घेतली. तर कराडमधील रयत सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे.

या कारखान्याचा ११.८२ टक्के एवढा साखर उतारा आहे. विभागात सहकारी साखर कारखान्यांनी ८४ लाख ९७ हजार ६१७ टन उसाचे गाळप केले. त्यातून ८६ लाख ५४ हजार ५४५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

तर साखर उतारा सरासरी १०.१८ टक्के एवढा होता. खासगी साखर कारखान्यांनी ७७ लाख ३ हजार ३०१ टन उसाचे गाळप केले. त्यातून ७० लाख ८९ हजार २०३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. साखर उतारा सरासरी ९.७२ टक्के एवढा होता.

जिल्हानिहाय ऊस गाळप (टनात) आणि साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)

जिल्हा --- कारखाने -- गाळप -- साखर उत्पादन -- साखर उतारा (टक्के)

सातारा -- १४ -- ६८,३१,८८९ -- ६८,०८,७६५ -- ९.९७

पुणे --- १७ -- ९३,६९,०३० -- ८९,३४,९८३ -- ९.५४

एकूण --- ३१ -- १,६२,००,९१९ -- १,५७,४३,७४८ -- ९.७२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT