Turmeric Market: हळद का खातेय भाव?

Team Agrowon

लागवड कमी

यंदा देशातील हळद लागवड कमी राहण्याचा अंदाज आहे. प्रमुख हळद उत्पादक राज्ये असलेल्या महाराष्ट्र आणि तेलंगणात अनेक भागात चांगला पाऊस नव्हता.

Turmeric | Agrowon

तामिळनाडूतील लागवड

चालू हंगामात महाराष्ट्रात १० ते २० टक्क्यांनी हळद लागवड कमी राहण्याचा अंदाज आहे. तर तामिळनाडूतील लागवड १० ते १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

Turmeric | Agrowon

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा

आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लागवडही १८ ते २२ टक्क्यानी घटण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात घटलीय.

Turmeric | Agrowon

हळद उत्पादक भागात पाऊस

सध्या हळदीची आवक सरासरीपेक्षा ५५ टक्क्यांनी कमी आहे. त्यातच आंध्र प्रदेश आणि काही हळद उत्पादक भागात जोरदार पाऊस झाला.

Turmeric | Agrowon

आवक कमी

त्यामुळे हळदीची बाजारातील आवक कमी झाली. यामुळे दरवाढीला आधार मिळाला. मसाला बोर्डाच्या अंदाजानुसार, देशात १३ लाख ३० हजार टन हळद उत्पादन झाले होते.

Turmeric | Agrowon

हळद निर्यात

तर यंदा उत्पादनात १८ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. हळद निर्यतीचा विचार करता देशातील हळद निर्यात मागील तीन महिन्यांमध्ये जवळपास ४० टक्क्यांनी वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारातच हळदीचा पुरवठा कमी आहे.

Turmeric | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Narnedra Modi | Agrowon
अधिक पाहण्यासाठी