देशातील नारळ तेल उद्योगाला दिलासा?

Devendra Shirurkar

चीन हा नारळ तेलाचा मोठा आयातदार देश आहे. इंडोनेशिया, फिलिपाईन्स,श्रीलंका, मलेशिया हे देश चीनला नारळ तेलाचा पुरवठा करतात. भारताची चीनला नारळ तेल निर्यात करण्याची योजना प्रत्यक्षात आल्यास देशाच्या नारळ तेल उत्पादन क्षेत्राला दिलासा मिळेल.

Coconut Oil | Agrowon

देशांतर्गत मागणी नसल्याने हे क्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीही तोंड देत असल्याचे तेल उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे.

Coconut Oil | Agrowon

निर्यातीचे निकष पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने सहकार्य केले तर भारतीय नारळ त्याला चीनच्या बाजारपेठेत मोठी संधी मिळू शकेल, असा विश्वासही या क्षेत्राकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Coconut Oil | Agrowon

भारताकडून सध्या अमेरीका, कॅनडा, इंग्लडला पॅकिंग केलेले आणि कच्चे नारळ तेल निर्यात केले जाते. चीनमध्ये नारळ तेल निर्यातीचा मार्ग मोकळा झाल्यास नारळ तेल क्षेत्रासाठी तो दिलासा ठरेल. हा दिलासा निर्यातीच्या प्रमाणावर अवलंबून असेल, असा कयास कोचीन ऑइल मर्चंट्स असोसिएशनचे संचालक तलत महमूद यांनी व्यक्त केला आहे.

Coconut Oil | Agrowon

देशांतर्गत नारळ तेल उद्योगाला आधार देण्यासाठी भारतीय नारळ तेलाचे दर कमी झाले तरच निर्यातीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. पुरवठ्यातील मर्यादा कमी झाल्याने जागतिक स्तरावरील खाद्यतेलाच्या किमतीत घसरत आहेत. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारातील नारळ तेलाच्या दरांतही उमटतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Coconut Oil | Agrowon