केळीवर पडणार का हवामान बदलाचे सावट ?

Devendra Shirurkar

भारतात केळी हे अत्यंत लोकप्रिय फळ आहे. जगातील प्रमुख केळी उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. जगात केळीचे सगळ्यात जास्त उत्पादन आणि खप भारतातच होतो.

Banana | Agrowon

देशातल्या सगळ्या प्रातांमध्ये मिळणारे हे फळ अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. तसेच केळीचा दरही कमी असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला हे फळ परवडते.

Banana | Agrowon

देशातील केळीच्या व्यावसायिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 50 टक्‍के आहे. परंतु केळीच्या जैवविविधतेच्या बाबतीत केरळ आणि तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. या राज्यांत केळीच्या अनेक जाती पिकवल्या जातात.

Banana | Agrowon

गरिबांचे फळ म्हणून ओळखली जाणारी केळी हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत नाहीशी होईल की काय, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटू लागली आहे. कृषी अभ्यासकांच्या मते हवामान बदलात टिकाव धरण्याची क्षमता केळी या पिकामध्ये नाही. सध्या जगभरातील तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे केळीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Banana | Agrowon

संशोधकांच्या म्हणण्यानुसार तापमानातील सततच्या वाढीमुळे काही भागात केळी काढणीस उशीर होण्याचा अंदाज आहे. तर काही देशांत काढणी उलटण्याची शक्यता आहे. २०५० नंतर अनेक देशांत केळीच्या उत्पादनात हेक्टरी ०.५९ ते ०.१९ टन घट होईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

Banana | Agrowon

भारत, ब्राझील व इतर सात देशांमधील केळी पिकाला हवामान बदलाचा जबर फटका बसू शकतो. येणाऱ्या काळात हवामान बदलाचे अधिक नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. भारतासारख्या देशात तंत्रज्ञान आधारित उत्पादनवाढीचे उपक्रम हाती घेतले तरच हे नुकसान कमी करता येईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Banana | Agrowon

जगभरात सुमारे ४० कोटी लोकांच्या रोजच्या आहारात केळी असते. त्यामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट झाल्यास अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अमेरिका आणि नेदरलँडमधील अभ्यासकांच्या मते जगभरात केळीच्या रोपांना बुरशीचा संसर्ग होत आहे. हा संसर्ग वेळीच रोखला नाही तर उत्पादनात मोठी घट येणार, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana | Agrowon