Soybean Rate : सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा

Anil Jadhao 

देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे शुक्रवारी १४.६२ डाॅलर प्रतिबुसेल्सवर पोचले होते. तर सोयातेलाच्या वायद्यांमध्येही २.६८ टक्क्यांची वाढ झाली होती. सोयातेलाच्या वायद्यानं काल ७७.३१ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता.

सोयापेंडचे दरही दीड टक्क्यांनी सुधारून ४२० डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात वाढ झाली होती.

चीनमधील लाॅकडाऊन शिथिल झाल्याने येथील प्रक्रिया उद्योगातून आयात सोयाबीनला मागणी वाढतेय. युक्रेनमधून सूर्यफुल तेल आयात पुन्हा थांबली. त्याचा परिणाम जागतिक खाद्यतेल बाजारावर होतोय.

बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर पामतेलाच्या दरात वाढ झाली. शुक्रवारी बुर्सा मलेशियावर कच्च्या पामतेलाचे वायदे ४ हजार ३३७ रिंगीट प्रतिटनाने झाले. 

सोयाबीनच्या दरात आज पुन्हा क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. मध्य प्रदेशात सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये दर मिळतोय.

महाराष्ट्रतील दर ४ हजार ९०० हजार ते ५ हजार ३०० रुपयांवर पोचलाय. राजस्थानमध्येही हीच दरपातळी आहे. सध्या देशातील बाजारात सोयाबीनला दर वाढतोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image