Poly Mulching : प्लॅस्टिक आच्छादन वाढविते मातीचे प्रदूषण

Team Agrowon

वॉशिंग्टन येथील संशोधन

कॅलिफोर्निया येथील स्ट्रॉबेरी लागवडीत प्लॅस्टिक आच्छादनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे मातीमध्ये प्लॅस्टिकच्या सूक्ष्म कणांचे प्रदूषण वाढत असल्याचे वॉशिंग्टन येथील संशोधनातून समोर आले आहे.

Poly Mulching | agrowon

कॅलिफोर्निया पॉलिटेक्निक राज्य विद्यापीठाचे संशोधन

या प्लॅस्टिक कणांचा जमिनीच्या आरोग्यावर दीर्घकालीन विपरित परिणाम होतो. याविषयी कॅलिफोर्निया पॉलिटेक्निक राज्य विद्यापीठातील पोस्ट डॉक्टरल संशोधक डॉ. एकता तिवारी यांनी ल्योन येथे आयोजित गोल्डश्मिट भू-रसायनशास्त्राच्या परिषदेत त्यांचे संशोधन सादर केले.

Poly Mulching | agrowon

स्ट्रॉबेरी शेताचे सर्वेक्षण

आपल्या संशोधनाबाबत माहिती देताना डॉ. तिवारी म्हणाल्या, की या अभ्यासासाठी आम्ही स्ट्रॉबेरी शेताचे सर्वेक्षण करून त्यातून जमिनीच्या वरील पृष्ठभागावरील मातीचे नमुने घेतले. या मातीच्या नमुन्यामध्ये प्रति हेक्टर सुमारे २ लाख १३ हजार ५०० प्लॅस्टिक कण आढळून आले आहेत.

Poly Mulching | Agrowon

प्लॅस्टिक कणांचे विघटन होत नाही

या विश्लेषणासाठी इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करण्यात आला. थोड्या अधिक खोलीवरील नमुने घेतले असता त्याही पेक्षा अधिक प्लॅस्टिक कण आढळण्याची शक्यता आहे. कारण दरवर्षी स्ट्रॉबेरी उत्पादनामध्ये आच्छादन म्हणून वापरलेल्या प्लॅस्टिकचे ५ मि.मी. आणि त्या पेक्षा मोठे कण मोठ्या प्रमाणात मातीमध्ये मिसळतात. या कणांचे विघटन होत नसल्यामुळे दशकापेक्षा अधिक काळ तसेच जमिनीत राहतात.

Poly Mulching | Agrowon

प्लॅस्टिकऐवजी सेंद्रिय आच्छादनाला प्राधान्य हवे


प्लॅस्टिक आच्छादनाचे पिकाच्या वाढीवर काही चांगले परिणाम होत असले, तरी त्यापासून होणाऱ्या दीर्घकालीन प्रदूषणामुळे अनेक समस्या उद्‍भवू शकतात. मातीच्या कणांमध्ये प्लॅस्टिक कणांचे प्रमाण वाढत गेल्यास त्याचा मातीतील ओलावा, सूक्ष्म जिवांच्या श्‍वसन प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो.

Poly Mulching | Agrowon

नत्राचे प्रमाण कमी होते

पिकांना उपलब्ध होणाऱ्या नत्राचे प्रमाण कमी होते. मातीमधून प्लॅस्टिकचे छोटे छोटो कण काढण्याचे काम अत्यंत कठीण आणि खर्चिक आहे. एकदा प्लॅस्टिक आच्छादन वापरल्यानंतर अनिश्‍चित काळासाठी हे कण जमिनीमध्ये पडून राहतात. त्यामुळे भविष्यात आच्छादनासाठी सेंद्रिय घटकांच्या वापरावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे.

Poly Mulching | Agrowon

सेंद्रिय आच्छादन फायदेशिर

सेंद्रिय आच्छादन काही काळानंतर कुजून त्यातून सेंद्रिय कर्बासह अनेक पोषक घटकांची पिकाला उपलब्धता होते. जमिनीचे तापमान नियंत्रित राखले जाते आणि जमिनीतील ओलावा टिकून राहतो. परिणामी पाण्याची बचत होते. वनस्पतीभोवती उपयुक्त सूक्ष्म जिवांची वाढ होऊन सूक्ष्म वातावरण निर्मिती होते.

Poly Mulching | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Avocado Cultivation | Agrowon
आणखी पाहा...