Mahesh Gaikwad
प्राचीन काळापासून भारतीय स्वयंपाक घरांमध्ये मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. मोहरी केवळ जेवणाची चव वाढविण्यासाठीच नाही, तर आऱोग्याासाठीही फायदेशीर आहे.
मोहरीच्या तेलात अनेक पोषत घटक असतात. यामध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ऍसिड्स असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास सांधेदुखी, स्नायूंची वेदना आणि सूज यामध्ये आराम मिळतो.
मोहरीमधील औषधी गुणधर्मांमुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दातदुखीसाठी मोहरीचे तेल रामबाण आहे. मोहरीच्या तेलात मिठ घालून मसाज केल्यास हिरड्यांच्या मजबुतीसह दातदुखीपासून आराम मिळतो.
मोहरीच्या तेलात अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
मोहरीच्या तेलाने अंगाची मालिश केल्यास त्वचा मऊ आणि तजेलदार होते. तसेच त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
लहान मुलांची मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास हाडे बळकट होतात. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.