बांधावर, परसबागेत लावा पोषण आहार देणारी देशी झाडे

Anil Jadhao 

नीलिमा जोरवर

कांचन म्हणजे जंगलातील सोनेच. साधारण आपट्याच्या पानांसारखी दिसणारी याची पाने. शोधल्यावर याचे नाव सेमला कांचन असल्याचे कळले. काही ठिकाणी गुलाबी, पांढरा आणि पिवळा असे फुलांच्या रंगावरून काही प्रकार आहेत. तो कोरल, कांचनार, शीद अशा नावांनी वेगवेगळ्या भागांत ओळखला जातो.

Agrowon

कांचन झाडाच्या कोवळ्या शेंड्यांची, पानांची भाजी केली जाते. कांचन झाडाचे फूल असे असते.

म्हाळुंग हे लिंबासारखेच असणारे आपल्याकडील दुर्मिळ देशी झाड . ‘ई ई ईडलिंबूचा’ असे आपण लहानपणी शिकलो. भारतात लिंबाच्या एकूण ६८ प्रजातींची माहिती उपलब्ध आहे. या सगळ्यात जास्त वैशिष्ट्यपूर्ण आहे ते म्हाळुंग. आयुर्वेदानुसार म्हाळुंगाचा उपयोग रुचीकर व पित्तशामक आहे. जिव्हा, कंठ व हृदय यांना ते शुद्ध करते. हे फळ जितके जास्त जुने तितके खावयास चांगले, पाक, सरबत, मुरब्बा आणि लोणचे या स्वरुपात हे फळ खाल्ले जाते. “याच्यात सुई टोचून ठेवली तर त्याचेही पाणी होते. त्यामुळे मुतखड्यासारखा आजार याने लवकर बरा होतो,” असे लोक सांगतात.

Agrowon

फणसापासून अनेक पदार्थ बनविता येतात. भाजी, चिप्स, पुऱ्या हे पदार्थ चविने खाल्ले जातात. तर पिकलेल्या फणसाचे गरे खायला मस्तच असतात. पण याच्या बिया उकडून खाणे हे कोण चवदार प्रकरण! विशेषतः लहान मुलांचे भलतेच आवडते. फणसाचे चिप्स, फणसाच्या पुऱ्या हेही पदार्थ खाण्यास उत्तम लागतात. प्रत्येक कुटुंबाकडे किमान दोन ते पाच फणसाची झाडे असावीच असावी.

Agrowon

फणसापासून बनविलेली भाजी. कांदा, मिरची घालून भाजी चवदार होतेच. पणं गरम मसाला वापरला की अगदी मटण रस्साभाजीच होते.

Agrowon

भोकर हे एक वैशिष्ट्यपूर्ण भारतीय झाड. भर उन्हाळ्यात हमखास भाजी देणारे झाड. कोवळ्या पानांचे मुटके, भाजी तर खाल्ली जातेच. त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या मोहराची भाजी सुद्धा मस्त लागते. त्यानंतर येणाऱ्या कच्च्या फळांची भाजी खाल्ली जाते. शेळ्या-गायींना हा पाला व फळे खायला खूप आवडते.

Agrowon

भोकर झाडाला चैत्राच्या उन्हात कोवळी लुसलुशीत पालवी फुटल्यानंतर लगेच मोहर लागतो. याच्या मोहरापासून भाजी बनविली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon