Team Agrowon
गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, गारपीठ आणि अवकाळी पाऊसामुळे मोठं नुकसान झाले आहे.
सध्या महाराष्ट्रात अनेक भागात खऱीप हंगामातील पेरण्यांची कामे सुरू आहे. तर काही भागात पावसाने जोर न धरल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसून नये, यासाठी महाराष्ट्र सरकाराने शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पीक विम्यासाठी आॅनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी पीकपेरा स्वयं घोषणापत्र, सातबारावर उतारा, आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँकेचे पासबूक आणि सामाईक खातेदार असल्यास द्यावयाचे संमतीपत्राची आवश्यकता आहे
बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका या पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
खरीप पिकांचा विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै पर्यंत आहेत. शेतकऱ्यांनी अर्ज करताना तुमचा आधार कार्ड नंबर, त्याच्या खाली बँकेचा तपशील, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरायची आहे.
कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना त्यांचे खाते असलेल्या बॅंकेत, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी आदी ठिकाणी विमा काढता येतो.
या पीक विमा योजनेत नैसर्गिक आपत्तीमुळे पेरणी न होणे, पिकांची उगवण न होणे, काढणी नंतर नुकसान होणे आदीबाबींवर विमा संरक्षण मिळते,
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.