कृषी यंत्र खरेदीसाठी सरकारचे अनुदान

Devendra Shirurkar

शेतीकामात बऱ्याचवेळी कृषी उपकरणांचा वापर केला जातो. अलीकडील काळात तर ट्रॅक्टरशिवाय शेतीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. शेतीकामात केवळ ट्रॅक्टरच नव्हे तर इतर अनेक अवजारांचा वापर केला जात असतो.

Agricultural Machinery | Agrowon

सरकारकडूनही आधुनिक शेतीचा आग्रह धरताना कृषी यांत्रिकीकरणाची गरज व्यक्त करण्यात येते. कृषी उपकरणांचा वापर करून शेतकऱ्यांना आपल्या उत्पादक खर्चात बचत करता येणे शक्य होते.

Agricultural Machinery | Agrowon

वेळ, श्रम,पैसा वाचवणे शक्य होते. मात्र या कृषी उपकरणांच्या किंमती पाहता सगळ्यांनाच ही कृषी अवजारे विकत घेणे शक्य होत नाही. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानही देण्यात येते.

Agricultural Machinery | Agrowon

उत्तर प्रदेश सरकारने अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांना कृषी यंत्रांची खरेदी करता यावी यासाठी एक अनुदान योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

Agricultural Machinery | Agrowon

उत्तर प्रदेश कृषी यंत्र अनुदान योजनेच्या माध्यमातून त्या राज्यातल्या शेतकऱ्यांना टोकन दिली जात आहेत. या टोकनच्या माध्यमातून कृषी यंत्रांसाठी ५० टक्क्यांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.

Agricultural Machinery | Agrowon

छोट्या, अल्पभूधारक आणि मागासवर्गीय प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजने अंतर्गत उत्तर प्रदेश कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना टोकन दिले जाणार आहेत.

Agricultural Machinery | Agrowon

हॅरो, कल्टिव्हेटर, मिनी राईस मिल, पॉवर टिलर, लेसर लँड लेव्हलर, मल्टी क्रॉप थ्रेशर, पॉवर चॉप कटर, ट्रॅक्टर माऊंडेड स्प्रेयर, डिस्क प्लो, ऑइल मिल विथ फिल्टर प्रेस, रोटावेटर,स्ट्रॉ रिपर, पॅकिंग मशीन, पोटॅटो डीगिंग मशीन, कस्टम हायरिंग इत्यादी कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना या अनुदान योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Agricultural Machinery | Agrowon

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्याला पाहिजे त्या कृषी अवजारांची खरेदी करता येणार आहे, त्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

Agricultural Machinery | Agrowon

कृषी यंत्र अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करताना शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, स्वतःचे छायाचित्र, आधाराशी लिंक मोबाईल नंबर आदी माहिती पुरवावी लागते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Machinery | Agrowon